Baby Care Tips : बाळ पहिल्यांदा चालायला शिकतय? तर चिमुकल्यांची योग्य काळजी घेण्यासाठी पालकांनी 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा !
Baby Care Tips : घरातील चिमुकल्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी पालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. बाळाच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. त्यातील एक म्हणजे बाळ जेव्हा पहिल्यांदा चालायला लागते. तो पालकांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो.
त्याच्यात वेगळाच उत्साह असतो, त्यामुळे पालकांनाकडून नकळत पणे उत्साहाच्यात भरात काही चुका होतात. तर त्या चुका टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यासंबधित माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
1. वॉकर वापरू नये
पालक जेव्हा आपल्या मुलाला पहिल्यांदा चालायला शिकवतात तेव्हा ते हमखास वॉकर वापरताना दिसतात. मात्र लहान मुलांना वॉकरवर चालायला शिकवू नये. कारण लहान मुल चालण्यासाठी पूर्णपणे वॉकरवर अवलंबून राहतात परिणामी मुल (Kids) लवकर चालायला शिकत नाहीत.म्हणून मुलांपासून वॉकर दूर राहिलेले चांगले.
2. चटई किंवा कार्पेटचा वापर
जेव्हा मुल चालण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा घरात चटई टाकून ठेवावी. चटई असल्यामुळे जरी बाळाचा तोल गेला तरी त्याला कमी दुखापत होईल. मुलांना गुळगुळीत जमिनीवर अजिबात सोडू नका, त्या जमिनीवर मुलांची घसरण्याची भिती अधिक असते.
3. तेलाने मालिश करायला विसरू नका
लहान मूल अतिशय नाजूक असल्याने त्यांचे स्नायू खूप कमकुवत असतात. त्यामुळे मुलांसाठी तेल मालिश खूप उपयुक्त ठरते.लहान मुलाना तेलाने मालिश केल्याने स्नायू मजबूत होतात. विशेष म्हणजे मुलं जेव्हा चालायला शिकतात तेव्हा त्यांच्या पायाची काळजी घेण्यासाठी दररोज पायाला मालिश करा. मालिश करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. त्याचबरोबर मोहरीचे तेल (Oil) देखील वापरू शकता.
4. चालण्यास मदत करा
बाळ जेव्हा पहिल्यांदा चालते तेव्हा त्याला आधाराची गरज असते. अशा वेळेस तुम्ही बाळाचा हात धरून त्यांना हळूहळू चालवण्यास सहकार्य केले पाहिजे. दररोज थोडा वेळ काढून मुलांकडून चालण्याचा सराव करून घेतल्याने मुलांना लवकर चालता येते.
5. मुलांना बोट धरून चालायला शिकवा
बाळ जेव्हा चालायला शिकते तेव्हा नेहमी त्यांच्या सोबत रहाणे गरजेचे आहे. तुमचे बोट धरून बाळाला चालायला शिकवा कारण बाळ जेव्हा पहिले पाऊल टाकते तेव्हा त्याचा पूर्ण जर तुमच्या बोटाच्या असतो. बाळ (Baby) पडायला लागल्यावर त्याला धरण्यासाठी तुमच्या बोटाचा आधार मिळतो .
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.