Skin Allergies: पावसाळ्यातील त्वचेच्या अॅलर्जीसाठी घ्या अशी काळजी Saam Tv news
लाईफस्टाईल

Skin Allergies: पावसाळ्यातील त्वचेच्या अॅलर्जीसाठी घ्या अशी काळजी

ओलसर हवामान आणि सौम्य तापमान हे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते. ज्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवतात.

Anuradha Dhawade

Monsoon Skin Allergies

उन्हाळ्यातील (Summer Season) कडाक्याच्या उन्हापासून मान्सून (Monsoon) आल्हाददायक वातावरण घेऊन येतो. पण पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा (Infectious diseases) धोकाही अधिक असतो. सर्दी, खोकला, तापासह पावसाळ्यात अॅलर्जीचे आजारही उद्भवू शकतात. ओलसर हवामान आणि सौम्य तापमान हे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते. ज्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवतात.

तसेच, पावसाळ्यात घामामुळे त्वचेची जळजळ आणि फंगल इन्फेक्शनही झपाट्याने वाढते. ज्यामुळे त्वचेची अॅलर्जीच्या समस्या उद्भवतात. पावसाळ्यात त्वचेच्या पाच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी या त्वचेच्या अॅलर्जी होऊ नयेत, किंवा झाल्यास काय उपाय करावेत, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखील पहा-

खाज सुटणे

पावसाळ्यात अनेक लोक दूषित पाण्याच्या संपर्कात येतात ज्यामुळे त्यांना खाजेची समस्या उद्भवू शकते. हा पाण्याशी संबंधित रोग आहे जो परजीवी माइट्समुळे होतो, जो उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

खाजेमुळे त्वचेवर पुरळ उठतात आणि तीव्र खाज सुटू लागते. अशावेळीउपचारासाठी त्वच्या तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच अँटिसेप्टिक एजंट्सने सर्व तागाचे आणि कपडे धुवायला हवेत.

इसब

उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि पावसाळ्यातील ओलसर हवामान अशा अचानक झालेल्या बदलामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते. परिणामी, त्वचा एक्झिमॅटस बनते. यामुळे पुरळ येणे, त्वचा लाल होणे, खाज सुटणे आणि कोरडी पडणे, अशा समस्या उद्भवू शकतात. या मुख्यतः पाय, हात किंवा पायांच्या खालच्या भागावर परिणाम करतात. त्वचेची जळजळ टाळण्यासाठी, हलके आणि आरामदायक कपडे घालणे महत्वाचे आहे. तसेच, त्वचेच्या अशा समस्यांसाठी नारळाचे तेल शरीराच्या प्रभावित भागांवर देखील लावल्यास आराम मिळू शकतो.

पुरळ

पावसाळा सुरू झाल्यावर त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढू लागतात. दमट हवामानासह कमी झालेल्या तापमानामुळे परागकण हवेत मिसळतात, त्यामुळे त्वचेच्या अॅलर्जीच्या समस्या उद्भवू लागतात. यामुळे वारंवार शिंका येणे आणि सर्दीच्या त्रास असणारे लोक जास्त प्रभावित होतात. तसेच त्यामुळे त्वचेच्या अॅलर्जीच्या समस्याही उद्भवू लागतात. अशा प्रकारच्या अॅलर्जीचा प्रसार कमी करण्यासाठी, झाडे घराच्या आत लावलेली झाडे बाहेर ठेवणे आणि पाळीव प्राण्यांपासून दूर राहायला हवे. तसेच, घर स्वच्छ आणि व्यवस्थित असायला हवे.

पायांना होणारे फंगल इन्फेक्शन

पायांना होणारे फंगल इन्फेक्शन हा पावसाळ्यात होणारा सामान्य संसर्ग आहे. कारण पायात जास्त ओलावा टिकून राहणे किंवा ओले सॉक्स आणि शूजमुळे पायांना घाम येतो. त्या ओलसरपणामुळे पायांच्या तळव्यांना जखमा होणे, बोटांची नखे तुटणे किंवा क्रॅक होणे, पायात खाज सुटणे आणि त्वचा सोलणे अशी समस्या उद्भवते. ही गंभीर स्थिती नसली तरी ती अत्यंत संक्रामक आहे. हा संसर्गापासून दूर राहण्यासाठी,पायांमधील ओलावा नियंत्रणात ठेवण्यासाठी अँटीफंगल पावडर वापरू शकता. बाहेरून घरी आल्यानंतर पाय नीट धुतल्यास या समस्येचा त्रास होणार नाही.

चट्टे

पाय, काख किंवा मानेवर गोलाकार, लाल ठिपके असे संसर्गही पावसाळ्यात होऊ शकतात. हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे ज्यामुळे खाज येते. अशा समस्या दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यामुळे पसरतो. ज्यांना त्वचेची अशी समस्या आहे, त्यांनी नेहमी स्वच्छ, सैल कपडे घालावेत. त्याचबरोबर त्वचेच्या तज्ञांच्या सल्लाने उपचार करावेत. बुरशीविरोधी क्रीम वापरावेत. पाय नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत.

अनेक लोकांना पावसाळ्यात त्वचेच्या अॅलर्जीचा सामना करावा लागतो. तथापि, वारंवार पाय आणि हात धुणे, स्वच्छ कपडे घालणे, प्रदूषित आणि धुळीच्या वातावरणापासून दूर राहणे आणि त्वचेच्या अॅलर्जीमुळे गंभीर अडचणी आल्यास त्वचेच्या तज्ञांशी सल्लामसलत करणे यासारख्या योग्य उपायांमुळे, पावसाळ्याचा आनंद घेता येतो.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT