ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
समाजात रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. परंतु, वैद्यकीय शास्त्रानुसार, रडण्यामुळे भावना व्यक्त होतात आणि यामुळे आरोग्याला फायदे होतात.
आज आम्ही तुम्हाला रडण्याचे आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत, जाणून घ्या.
रडताना शरीरात एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिनसारखे “feel-good” हार्मोन्स निर्माण होतात, जे मूड सुधारण्यात मदत करतात.
अश्रू डोळ्यांमधील धूळ आणि इरिटंट्स साफ करतात, ज्यामुळे डोळ्यांची स्वच्छता राखली जाते.
रडल्यावर कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हार्मोन्स शरीरातून बाहेर पडतात, ज्यामुळे मन शांत होते आणि ताण कमी होतो.
जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास असेल तर रडल्याने बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होतो.
झोप पूर्ण न होणे किंवा निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांनी नक्की रडावे, यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.