ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात त्वचेशी संबधित समस्या वाढतात, तसेच चेहरा चिकट आणि काळा पडतो.
टॅनिंग दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जाणून घ्या.
काकडीचा रस, मध आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
हळद आणि दह्याचा मास्क त्वचेसाठी अँटी-बॅक्टेरियल म्हणून काम करतो. तसेच यामुळे मुरुम आणि डागांपासून आराम मिळतो.
बेसन आणि गुलाबजल मास्क चेहऱ्यावर लावल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहरा उजळतो.
कडुलिंब आणि मधाचा मास्क स्कीन इन्फेक्शन आणि अॅलर्जीपासून बचाव करते आणि त्वचा निरोगी ठेवते.
त्वचेला हायड्रेट आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि टोमॅटोचा फेस मास्क वापरु शकता.