ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटीन हे केस, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले महत्वाचे पोषक तत्व आहे.
प्रोटीनची कमतरता असल्यास शरीर आपल्याला काही संकेत देतं असतं, जाणून घ्या.
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे,दिवसभर अत्यंत सुस्त वाटणे, कोणतेही काम न करता थकवा येणे हे प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचा ड्राय होते. तसेच सुरकुत्या पडणे हे देखील प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण आहे.
प्रोटीनच्या कमतरेमुळे केस गळतात. तसेच केस खूप पातळ होता, केसांच्या वाढीसाठी शरीरात प्रोटीनची आवश्यकता असते.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, यामुळे एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडू शकते.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे मूड स्विंग आणि चिडचिड होऊ शकते. प्रोटीन शरीरात न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करते जे मन स्थिर ठेवते.