बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या अभिनयाचे जितके कौतुक केले जाते तितकेच तिचे चाहते तिच्या फिटनेस आणि फिगरने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे तुम्हालाही तापसीप्रमाणे स्वत:ला फीट ठेवायचे असेल तर तिच्या फिटनेसचे रहस्य पुढील प्रमाणे आहे.
तापसी पन्नू तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. पिंक आणि मनमर्जियांमधून नाव कमावलेली तापसी तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेत असते. लोक सहसा जिममध्ये खूप घाम गाळतात, तापसी तंदुरुस्त शरीरासाठी जिमऐवजी स्क्वॅशला प्राधान्य देते. ती दररोज किमान अर्धा तास स्क्वॅश खेळते जेणेकरून तिला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवता येईल.
तापसी पन्नूच्या फिटनेसचे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे योगा. स्ट्रेंथ एक्सरसाइज व्यतिरिक्त तापसी पन्नू स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते. तापसी पन्नू सकाळी उठते, एक लिटर गरम पाणी पिते आणि काजू खाते. यानंतर ती एकतर ग्रीन टी आणि काकडी किंवा सेलेरी ज्यूस घेते.
तापसी पन्नू निश्चितपणे ग्लूटेन आणि लैक्टोज मुक्त आहार घेते. ती भात, रोटी आणि भाकरी खूप आवडीने नियमित खाते. तापसीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती खूप भात खाते. तापसी पन्नूच्या आहारात दुधाचाही महत्त्वाचा वाटा आहे. तापसीला दूध प्यायला आवडते. दुध आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
याशिवाय ती स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि तिची त्वचा ताजी ठेवण्यासाठी दिवसभर पाणी पीत राहते. हेच तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे मोठे रहस्य आहे. ही एक साधी पद्धत वाटत असली तरी ती शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. तापसी पन्नूला स्वतःला फीट ठेवण्यासाठी कार्डिओसोबतच वर्कआउट करायला आवडतात. याशिवाय तापसी तिच्या आहारावर विशेष लक्ष देते.