Spinach Puri
Palak Puri Recipeyandex

Palak Puri Recipe : अवघ्या 10 मिनिटात खस्ता पालक पुरी; वाचा संपुर्ण रेसिपी

spinach Puri recipe: दररोज नाश्त्याला काय करायचं? हा प्रश्न आता फक्त गृहिणींनाच नाही तर नाश्ता करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडला आहे.
Published on

दररोज नाश्त्याला काय करायचं? हा प्रश्न आता फक्त गृहिणींनाच नाही तर नाश्ता करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडला आहे. रोज पोहे, उपमा, शिरा, डोसे, इडली, डोसा हे पदार्थ झटपट बनतात म्हणून आपण ते नाश्त्याला खातो. पण त्यातुन शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात असे नाही. या समस्येचा विचार करुन आम्ही तुमच्यासाठी एक झटपट आणि हेल्दी रेसिपी आणली आहे.

त्यात पालक या पालेभाजीचा समावेश असणार आहे. पालकामध्ये आयरन असते, त्यामुळे रक्ताची कमी पूर्ण होते. पालक आणि पुरी पीठ हे पचनसाठी चांगले आहे. यातील फायबर मुळे आहारातील कमतरता भरून निघते. जीरा आणि धणे मुळे डायजेस्टिव सिस्टम चांगले राहते. आता तुम्हाला कळलेच असेल आपण आज पालक पुरीची झटपट रेसिपी पाहणार आहोत.

Spinach Puri
Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

पालक पुरी रेसिपीचे साहित्य:

2 कप गव्हाचे पीठ

1/2 कप ताजी पालकची ताजी पाने

1/2 चमचा जीरे

1/4 चमचा धणे

1/4 चमचा हळद

मीठ चवीनुसार

तेल

पालक पुरीची कृती:

पालकाची पाने धुवून किसून घ्या. मग मिक्सरला लावून बारिक पेस्ट तयार करा. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, जिरं पावडर, हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा. त्यात चिरलेल्या पालकची पेस्ट तूप किंवा तेल घालून चांगलसं मिसळा. आता हळूहळू पाणी अ‍ॅड करत कणिक मळा. कणिक गुळगुळीत आणि सैल असू नये. पुरीच्या आकारात गोळा करून पुरी लाटा तुम्ही वाटीने सुद्धा लाटू शकता. कढईत तेल गरम करून पुरी तळा. सर्व पुऱ्या कुरकुरीत तळाव्यात. आता गरमागरम पालक पुरी सर्व करा.

हेल्दी टिप्स:

1. पुरी पीठ कमी तेलात फ्राय करा.

2. पालकाच्या जागी इतर भाज्या देखील वापरू शकतात.

3. नाश्त्यात कोऱ्या चहा बरोबर पुरी खावू शकता घ्या. या रेसिपीचा आनंद घ्या आणि आरोग्यदायी नाश्ता करा!

Written By: Sakshi Jadhav

Spinach Puri
Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com