Coronary Artery Blockage 
लाईफस्टाईल

Coronary Artery Blockage : हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याच्या काही दिवस अगोदर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या, अन्यथा...

Coronary Artery Blockage : कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजची समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. अशा परिस्थितीत कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजची लक्षणं वेळेत समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेव्हा हृदयाच्या आजूबाजूच्या नसा पातळ झाल्या की, त्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ लागतात. याचाच अर्थ कोरोनरी आर्टरी ब्लॉक होते आणि याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हटलं जातं. या समस्येमुळे भविष्यात अनेक गंभीर आजारही होऊ शकतात.

अधिक प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या नसा पातळ होऊ शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजची लक्षणं वेळेत समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे वेळेवर उपचार सुरू करता येऊ शकतात.

कोरोनरी आर्टरी ब्लॉक होते म्हणजे नेमकं काय होतं?

एथेरोस्क्लेरोसिसमुळे धमन्या ब्लॉक होतात तेव्हा कोरोनरी आर्टरी डिजीज होतो. एथेरोस्क्लेरोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोलेस्टेरॉल, फॅटी डिपॉझिट तसंच इतर पदार्थ कोरोनरी धमन्यांमध्ये जमा होतात.

कोरोनरी ब्लॉकेज सुरु होण्याचे संकेत काय आहेत?

श्वास घेण्यास त्रास होणं

ज्यावेळी व्यक्तीला मेहनतीचं काम केल्यानंतर किंवा बसल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होतो हे लक्षणं या डिसीजचं असू शकतं. ही लक्षणं हृदयाला रक्त प्रवाहाची कमतरता दर्शवू शकतात. यावेळी छातीत दुखण्याची समस्याही जाणवू शकते.

छातीत अस्वस्थ वाटणं

कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे छातीत अस्वस्थता जाणवणं. ही वेदना छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जाणवू शकते. त्याचप्रमाणे खांदे, मान याठिकाणी वेदना होऊ शकतात.

थकवा जाणवणं

जर तुम्हाला अचानक दैनंदिन काम केल्यानंतर खूप थकवा जाणवू लागला तर हे धमन्यांमध्ये ब्लॉकेज असण्याचे संकेत असू शकतात. या थकव्यामुळे शारीरिक क्षमता कमी होऊ शकते.

चक्कर येणं

बेशुद्ध होणं, चक्कर येणं हे हृदयाला रक्त प्रवाह कमी झाल्याचे संकेत आहेत. हे अचानक घडू शकतं. यावेळी छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता आहे.

अपचन

काही व्यक्तींना पोटाच्या वरच्या भागात मळमळ होण्याचं लक्षण जाणवत असेल तर ते कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजचं लक्षण असून शकतं. यावेळी रूग्णाला अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

Winter Yoga Time: हिवाळ्यात योगा करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

Wednesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

या दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला|VIDEO

Guhagar Beach : 'गुहागर' बीचला गेल्यावर काय काय पाहावे? येथे आहे निसर्ग सौंदर्याचा खजिना

SCROLL FOR NEXT