Surya Grahan 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी ठरेल घातक, होतील वाईट परिणाम

Surya Grahan 2025 Last Solar Eclips: सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भारतात ते दिसणार नसले तरी वृषभ राशीसाठी घातक मानले जात आहे. जाणून घ्या या सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रीय परिणाम.

Manasvi Choudhary

सूर्यग्रहण अत्यंत अशुभ मानले जाते. यावर्षी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र भारतात ते दिसणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण खूप खास मानले जाते कारण हे पितृ अमावस्येशी जुळते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा राशींवर परिणाम दिसेल तर आज आपण जाणून घेऊया वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृषभ राशीवर कसा परिणाम करेल.

सूर्यग्रहणाची वेळ

भारतीय प्रमाण वेळेनुसार, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण रविवार २१ सप्टेंबर २०२५ रोजी होईल. हे ग्रहण उद्या रात्री ११ वाजता सुरू होईल आणि २२ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ३.२३ वाजता समाप्ती होईल. ४ तासापेक्षा अधिकचा हा कालावधी असेल. हे ग्रहण शिखर वेळ पहाटे १:११ वाजता असेल.

कुठे दिसणार सूर्यग्रहण

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ते प्रामुख्याने दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या काही भागातून दिसेल. भारतात ते दिसणार नसल्याने सूतक काळ लागू होणार नाही असं मानलं जातय.

वृषभ राशींवर होणार परिणाम

२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा मानसिक परिणाम दिसून येईल. वृषभ रास असलेल्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणताही निर्णय घेतलाना योग्य विचारपूर्वक घ्या. छोट्या छोट्य गोष्टींवरून गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.

सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे आर्थिक गोष्टीवर परिणाम होऊ शकतो. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार, कर्ज किंवा नवीन व्यवहार करणे टाळावे. खोट्या आणि फसव्या व्यक्तींपासून सावध राहा.

कुटुंबातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो. मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणतीही परिस्थिती संयमाने हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष देणे. मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

Badlapur Local : बदलापूरमध्ये प्रचंड गोंधळ, सीएसएमटी लोकल तब्बल ४० मिनिटं उशिरा

Milk Tips: दुधासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?

Maharashtra Maritime Board : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामगारांना दीपावली बोनस जाहीर | VIDEO

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेना मोठा धक्का, आणखी एक महत्वाचा निर्णय रद्द

Central Railway: मध्य रेल्वेच्या लोकल लेटमार्कला फुलस्टॉप, कर्जत स्टेशनचे रिमॉडेलिंग, काय झाला बदल, अन् फायदा काय होणार?

SCROLL FOR NEXT