Surya Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Gochar 2023 : येत्या 3 दिवसांत या 4 राशींचे पालटणार भाग्य ! नोकरीत बढतीची शक्यता

Surya Gochar in Mithun rashi : मिथुन राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशाने 12 राशींवर परिणाम करेल.

कोमल दामुद्रे

Suryacha Mithun Rashit Pravesh : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचा राजा हा सूर्य देव मानला जातो. ग्रहांच्या परिवर्तानामुळे अनेक राशींवर त्याचा विशिष्ट परिणाम होतो. सूर्य देवाला यश, आत्मविश्वास व आरोग्याचा कारक मानले जाते.

१५ जूननंतर सूर्य हा मिथुन (Gemini) राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीतून सूर्य व शुक्र या बाहेर पडल्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशाने 12 राशींवर परिणाम करेल. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण 4 राशीच्या लोकांचे नशीबवान ठरणार आहे. चला जाणून घेऊया सूर्य संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

1. मेष

सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. धनलाभ होईल. धैर्य व पराक्रम वाढेल, ज्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. समाजात आदर वाढेल. नेतृत्व क्षमता चांगली राहील. गुंतवणुकीतून फायदा (Benefits) होईल. भावंडांशी सुसंवाद ठेवा.

2. सिंह

सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे याचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना देखील अनुकूल परिणाम देईल. नोकरीच्या (Job) ठिकाणी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत बदल होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. उच्च पदावरील लोकांशी संबंध निर्माण होतील. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते.

3. कन्या

कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. कोणत्याही कामात यश मिळेल. परदेशात जाण्याचे किंवा परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक जीवन चांगले होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.

4. कुंभ

या लोकांना अनेक नव्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. हा काळ तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देईल, पदोन्नती-पगारवाढीचा योग निर्माण करेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पात किंवा व्यवसायात नवीन कल्पनांचा समावेश कराल त्यामुळे फायदा होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT