Body Odour Remedies Google
लाईफस्टाईल

Body Odour Remedies: उन्हाळ्यात तुम्हालाही घामाचा उग्र वास येतोय? या घरगुती टीप्स करा ट्राय

Homemade Remedies For Bad Body Odour: उन्हाळ्यात घाम येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. शरीरातील गर्मी घामाद्वारे शरीराबाहेर जाते. परंतु या घामाचा वास अनेकांना सहन होत नाही. जर तुमच्याही घामाचा उग्र वास येत असेल तर वेळीच उपाय करा. घामाच्या वासातून दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात घाम येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. शरीरातील गर्मी घामाद्वारे शरीराबाहेर जाते. परंतु या घामाचा वास अनेकांना सहन होत नाही. घामाच्या वासातून दुर्गंधी निर्माण होते. अनेकदा आजूबाजूच्या लोकांना तुमच्या शेजारी उभे राहणे कठीण होते. त्यामुळे कधीकधी स्वतः लाच लाज वाटू लागते. जर तुमच्याही घामाचा उग्र वास येत असेल तर वेळीच उपाय करा. घामाच्या वासातून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करु शकतात.

खोबरेल तेल

नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड असतात. जे अँटी मायक्रोबियल आहेत. जे शरीरात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर ठेवतात. तसेच त्वचेचे पीएच बॅलेन्स करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुमच्या काखेत तुम्ही खोबरेल तेल लावू शकतात. नियमितपणे काखेत खोबरेल तेल लावले तर तुमच्या शरीरातील दुर्गंधी कमी होईल.

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. लिंबूमधील सायट्रिक अॅसिड तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया दूर ठेवतात. त्यामुळे तुमच्या शरीरातून दूर्गंधी येत नाही. तसेच तुम्ही तुमच्या लिंबू आणि पाण्याचे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन काखेत लावू शकतात. यामुळेही घामाची दुर्गंधी येणार नाही.

बेकिंग सोडा

तुमच्या काखेतून जर दुर्गंधी येत असेल तर त्यासाठी बेकिंग सोडा प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून घट्ट मिश्रण तयार करावे लागेल. त्यात एक स्वच्छ कपडा बुडवून तो काखेत ठेवा. बेकिंग सोडामध्ये कोणताही द्रवपदार्थ शोषण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे काखेतील अतिरिक्त मॉइश्चरायझर शोषून घेता येतो. परिणामी काखेतील ओलावा आणि त्यातून येणारा वास दूर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

SCROLL FOR NEXT