ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडेंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी इत्यादी पोषक त्त्व असतात त्यामुळे आरोग्याला फायदा होतो.
उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
लिंबू पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली राहते, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.
शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. त्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सीडेंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढण्यास मदत करतात.
लिंबू पाण्यात अँटिऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत होते.
दररोज लिंबू पाण्यचे सेवन केल्यामुळे शरिरात ताकद येते आणि त्यामधील पोषक धटकांमुळे शरीर निरोगी राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.