Heat Wave Precautions, Sunstroke Precaution Saam tv
लाईफस्टाईल

Sunstroke Precaution : सावधान! उष्माघात वाढतोय, कशी घ्याल आरोग्याची काळजी?

How To Prevent Heat Wave : सध्या उन्हाळा सुरु झाला असून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. या ऋतूमध्ये आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घ्यायल सांगितले जाते. बाहेरच्या तापमानासोबतच शरीराचे तापमान देखील वाढते.

कोमल दामुद्रे

Summer Care Tips :

सध्या उन्हाळा सुरु झाला असून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. या ऋतूमध्ये आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घ्यायल सांगितले जाते. बाहेरच्या तापमानासोबतच शरीराचे तापमान देखील वाढते.

या ऋतूमध्ये आपल्याला जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊन उलटी, मळमळ सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर राहिल्याने उष्माघाताचा धोका वाढतो.

उष्माघातामुळे आपल्याला आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे चक्कर येणे, डिहायड्रेशनची समस्येचा धोका वाढू शकतो. वाढत्या उन्हाळ्यात एप्रिल-जून या तिमाहित उन्हाच्या अधिक झळा सोसाव्या लागणार आहे असे मत भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. रखरखत्या उन्हापासून (Summer Season) वाचण्यासाठी या टीप्स (Tips) फॉलो करा

1. डिहायड्रेशनची समस्या

उन्हाळ्यात सनस्ट्रोकची समस्या अधिक प्रमाणात होते. त्यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ लागतो. यामुळे आपल्या शरीरातील द्रवपदार्थ कोरडे होऊ लागतात. यामुळे शरीरातील सोडियम आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. उष्माघातामुळे शरीरावर पुरळ, पोटात गरम पडणे, डोळ्यांची (Eye) आग होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

उष्माघातापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. तसेच घराबाहेर पडताना डोळ्यांवर सनग्लासेस लावा. टोपी किंवा छत्रीचा वापर करा.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी, ताक, लस्सी, नारळपाणी किंवा सफरचंदाचा ज्यूस पिऊ शकता. याशिवाय ग्लुकोज किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय प्या.

उन्हाळ्यात खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आहारात किवी, टरबूज आणि काकडी यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT