Summer Healthy Diet Tips: उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे खूप गरजेचं असतं. जर काळजी नाही घेतली तर अनेक गंभीर आजार होण्याचा धोका कायम असतो. कडक उन्हामुळे आणि उष्णतेच्या लाटेमुळे शरीराचे तापमान खराब होऊ लागते. यामुळे सकस आहाराचा अवलंब केला पाहिजे, नाही तर तुमचे आरोग्य बिघडू शकते.
उन्हाळ्यात माणसाने आपल्या जीवनशैलीसोबतच आहाराचीही काळजी घेतली पाहिजे. आज आपण अशा ५ प्रोबायोटिक पदार्थांची माहिती घेणार आहोत ज्याचा समावेश आपल्या आहारात करावा. उन्हाळ्यातील आहारात या पदार्थांचा समावेश केला तर आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होत असते.
प्रोबायोटिक पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे सर्दी, घसा खवखवणे यासारख्या मौसमी आजारांपासून आराम मिळतो. याशिवाय हानिकारक बॅक्टेरियाही शरीरात वाढत नाहीत, त्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.
दही
उन्हाळ्यात दही जरूर खावे. त्यात प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह हे सर्व आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया मजबूत राहते.
कोम्बुचा
कोम्बुचा चहा, साखर आणि यीस्टच्या मिश्रणापासून बनवला जातो. उन्हाळ्यात ते प्यायल्याने शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया निघून जातात, ज्यामुळे पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
केळी
या ऋतूत केळी जरूर खावीत. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, लोह, पोटॅशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. केळी खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होत असते.
केफिर
या ऋतूत केफिर खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. केफिर हे गाईच्या दुधापासून बनवले जाते. हे एक प्रकारचे आंबवलेले पेय आहे. हे प्यायल्यानंतर शरीरात थंडावा निर्माण होतो, त्यामुळे वारंवार उष्मघाताचा त्रास होत नाही.
लोणचे
उन्हाळ्यात काकडी, मिरची, गाजर यांचे लोणचे खाणे फायदेशीर ठरते. लोणचे खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. जे लोक नियमितपणे लोणचे खातात, त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत राहते.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही. या गोष्टींचा अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.