Summer Skin Care, Coconut Milk Face pack Saam tv
लाईफस्टाईल

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला टॅनिंगपासून दूर ठेवायचे आहे? ट्राय करा कोकोनट मिल्क फेस पॅक

Coconut Milk Face pack : त्वचा नैसर्गिक पद्धतीने हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधाचे फेशियल खूप फायदेशीर ठरु शकते. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा अधिक चमकदार ठेवण्यासाठी नारळाचे दुध उपयुक्त आहे.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

वाढत्या उष्णतेचा आपल्या त्वचेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. सूर्याच्या अतिनिल किरणामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण विविध सनस्क्रिन, टोनर्स, फेस पॅक, सीरम, फेशियल आणि क्लिन्सरचा वापर करतो.

परंतु, या केमिकल उत्पादनाचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. यासाठी त्वचा नैसर्गिक पद्धतीने हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधाचे फेशियल खूप फायदेशीर (Benefits) ठरु शकते. त्वचेचे आरोग्य (Health) सुधारण्यासाठी आणि त्वचा (Skin) अधिक चमकदार ठेवण्यासाठी नारळाचे दुध उपयुक्त आहे. नारळाच्या दुधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे मुरुम, पुरळ, काळी वर्तुळे इत्यादी दूर करतात. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.

  • चेहऱ्यावरील धुळीचे कण, ब्लॅक हेड्स आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी सर्वात आधी गरम पाण्यात गुलाबपाणी आणि नारळाचे दूध मिसळा.

  • यानंतर नारळाच्या दुधात एलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करा. ५ मिनिटांनी धुवा असे केल्याने त्वचेचे टॅनिंग दूर होते.

  • त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी नारळाच्या दुधात मध, साखर आणि ओट्स चांगले मिसळून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.

  • त्वचा अधिक तजेलदार दिसण्यासाठी काही वेळ चेहऱ्याला मसाज करा. नारळाच्या दुधात हळद, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल चांगल्या प्रकारे मिसळा. अर्धा तास चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

  • उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मध, तांदळाचे पीठ आणि गुलाबजल मिसळून नारळाचे दूध तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

UPSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; UPSC ने जारी केली भरती; अर्ज कसा करावा?

Dhananjay Mundhe : दारू पिऊन सुसाट चालवली गाडी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचा प्रताप; VIDEO व्हायरल

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT