Hands And Feet Tanning Home Remedies Saam tv
लाईफस्टाईल

Home Remedies To Remove Tan: उन्हामुळे हात-पाय काळवडंले ? या 5 टिप्स फॉलो करा, काळपटपणा होईल दूर !

How To Remove Tan at Home: वाढत्या उन्हाच्या पारामुळे आपण शरीराची कितीही काळजी घेतली तरीही टँनिंगचा सामना आपल्याला करावाच लागतो.

कोमल दामुद्रे

Skin Tanning Home Remedies : उन्हाळ्यात आपण कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडतो. वाढत्या उन्हाच्या पारामुळे आपण शरीराची कितीही काळजी घेतली तरीही टँनिंगचा सामना आपल्याला करावाच लागतो.

सूर्याच्या हानिकारक किरणांच्या संपर्कात आल्याने टॅनिंगच्या समस्येला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. सतत उन्हात राहिल्याने केवळ चेहराच नाही तर हात-पायांची त्वचाही (Skin) काळी पडते.

हात आणि पायांच्या टॅनिंगपासून लांब राहण्यासाठी बरेच लोक मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घेतात. हे उपचार महाग असण्यासोबतच तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही हात आणि पाय टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

1. कोरफड

कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर (Benefits) आहे. त्वचेचे डाग दूर करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. यामुळे त्वचेचा टोन देखील सुधारते. उन्हात तुमचे हात पाय काळे झाले असतील तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल लावावे. असे केल्याने त्वचेचा काळेपणा दूर होईल आणि त्वचा चमकदारही होईल.

2. लिंबू

हात आणि पायांचे टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबाचाही वापर करू शकता. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. यासाठी दोन चमचे लिंबाच्या रसामध्ये दोन चमचे गुलाबजल मिसळा. नंतर कापसाच्या साहाय्याने हात आणि पायांवर लावा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. नियमित वापराने, तुम्हाला लवकरच फरक दिसेल.

3. बटाट्याचा रस

जर तुमच्या हात आणि पायांची त्वचा सूर्यप्रकाशामुळे काळी झाली असेल तर बटाट्याचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो. यासाठी बटाटा (Potatoes) सोलून किसून घ्या. आता ते चांगले पिळून त्याचा रस काढा. हा रस हात आणि पायांवर लावा आणि थोडा वेळ कोरडा होऊ द्या. त्यानंतर पाण्याने धुवा.

4. काकडी

उन्हाळ्यात त्वचेसाठी काकडीचा रस खूप फायदेशीर आहे. हे केवळ त्वचेला थंड करत नाही तर टॅनिंग देखील दूर करते. काकडीचा रस त्वचेला हायड्रेट करण्यास देखील मदत करतो. उन्हामुळे हातपाय काळे झाले असतील तर कापसाचा गोळा काकडीच्या रसात बुडवा. आता हा रस हात आणि पायांना लावा. 15 ते 20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा.

5. दही

हात आणि पायांच्या टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. दही त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासोबतच त्वचा उजळण्यासही मदत करते. यासाठी 3 चमचे दह्यात अर्धा चमचा हळद मिसळा. ही पेस्ट हात आणि पायांवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. त्याच्या नियमित वापराने तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT