Suhana Sakal Swasthyam 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Suhana Sakal Swasthyam 2023: स्वास्थ्यम् मध्ये लेखक- वाचकांचा होणार संवाद, कधी आणि कुठे? जाणून घ्या

Suhana Sakal Swasthyam : सर्वांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे खूप महत्त्वाचे असते. यासाठीच मानसिक स्वास्थ आणि निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा महोत्सव १ ते ३ डिसेंबरदरम्यान होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Suhana Sakal Swasthyam:

सर्वांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे खूप महत्त्वाचे असते. यासाठीच मानसिक स्वास्थ आणि निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव १ ते ३ डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये होणार आहे.

हा महोत्सव सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.या महोत्सवाची सुरुवात संस्कृत आणि वैदिक मंत्राने होणार आहे. याचबरोबर अध्यात्म व योग गुरू श्री एम यांच्या हस्ते 'समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग' या विचारधारेवर असणाऱ्या स्वास्थ्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याचसोबत अनेक मान्यवरांशी संवाद साधला जाणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्याशी उपस्थितीत प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमात नागरिकांच्या निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या 'सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’या उपक्रमाअंतर्गत १ ते ३ डिसेंबरपर्यंत ध्यान, योग, शारिरीक- मानसिक स्वास्थ्यावर संवाद साधणार आहेत.

उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’, ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आहेत. याचबरोबर सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि’. व ’फिनोलेक्स केबल्स लिमिटेड’, ‘भारत फोर्ज लिमिटेड’ असून, ईव्ही पार्टनर ‘एथर’ आहेत.

हे कार्यक्रम १- ३ डिसेंबरदरम्यान होणार आहे. २ डिसेंबरच्या कार्यक्रमाची रुपरेखा

  • ठिकाण - पंडित फार्म्स, कर्वेनगर, पुणे

  • दिनांक- २ डिसेंबर

  • वेळ- सकाळी १० ते १०. १५

  • कार्यक्रम- स्वागत

  • वेळ १०.१५ ते ११.१५

  • कार्यक्रम- सुनील तांबे यांच्याशी आध्यात्मिक प्रवासाविषयी संवाद

  • वक्ता : सुनील तांबे, संचालक संतुलन आयुर्वेद

  • वेळ- ११.१५ ते १२:१५

  • विषय : संस्कृतयोग: डॉ. अनुराधा चौधरी यांच्यासोबत संवाद

  • वक्ता- डॉ. अनुराधा चौधरी, संस्कृत विद्वान

  • वेळ- १२.१५ ते १२.४५

  • वक्ता- गैया + डॉ अनुराधा चौधरी यांच्याशी संवाद

  • वेळ- १२.४५ ते १.१५

  • विषय- मुद्रा आणि ऊर्जा

  • वक्ता: श्रीमती अमृता चांदोरकर, संचालिका, निरामय वेलनेस सेंटर

  • वेळ- दुपारी २:०० ते ३:००

  • कार्यक्रम- Rabbi Sound Check

  • वेळ- ३.०० ते ३.४५

  • विषय- जीवनशैलीचे आजार आणि प्रतिबंध

  • वक्ता-डॉ. ज्योती दाभोळकर (अध्यक्ष - इंडियन सोसायटी ऑफ थायरॉईड सर्जन)

  • वेळ ४.०० ते ४.४५

  • वक्ता- राजीव शेठ यांच्याशी संवाद

  • वेळ- ५.०० ते ५.४५

  • वक्ता- श्री गौरी सावंत यांच्याशी संवाद

  • वेळ- ६.०० ते ६.४५

  • वक्ता- बॉलिवूड सेलिब्रिटींशी संवाद

  • वेळ- ८.०० ते ९.३०

  • कार्यक्रम- रब्बी शेरगील यांच्या संगीत मैफिलीचा आनंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT