Suhana Sakal Swasthyam Saam Tv
लाईफस्टाईल

Suhana Sakal Swasthyam 2023: ओंकारचा अर्थ काय? 'सकाळ स्वास्थ्यम्' च्या कार्यक्रमात ब्रिटन गैयाच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

Suhana Sakal Swasthyam: १ डिसेंबरपासून ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्' या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमात अनेक पाहुण्यांनी आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांना ऊर्जा दिली. गायिका गैय्या यांनी आपल्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Suhana Sakal Swasthyam :

सर्वांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे खूप महत्त्वाचे असते. यासाठीच मानसिक स्वास्थ आणि निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव १ ते ३ डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये होणार आहे.

१ डिसेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमात अनेक पाहुण्यांनी आपल्या कलांनी प्रेक्षकांना ऊर्जा आणि स्फूर्ती दिली. हिंदू धर्मातील प्रमुख चिन्ह म्हणजे ओम (ॐ). ‘अ’कार, ‘उ’कार आणि ‘म’कार या तीन वर्णांनी हे चिन्ह बनले आहे. या चिन्हाने खूप जास्त ऊर्जा मिळते. याचे दर्शन गायिका गैय्या संस्कृत यांनी शुक्रवारी घडविले.

गैय्या या मूळच्या ब्रिटनच्या असून त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभूत्व आहे. त्यांनी संस्कृत श्लोकांचे संगीताद्वारे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या स्वरांनी संपूर्ण प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाला होता.

या कार्यक्रमात ध्यात्म व योग गुरू श्री एम यांच्या हस्ते 'समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग' या विचारधारेवर असणाऱ्या स्वास्थ्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची पंचक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

या तीन दिवसाच्या कार्यक्रमात अनेक विषयांवर संवाद साधणार आहेत. अनेक पाहुणे, मान्यवर आणि अनेक क्षेत्रातील दिग्ग्ज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मानसिक, शारिरीक आरोग्य, योग, व्यायाम या गोष्टींवर संवाद साधणार आहेत. त्याचसोबत आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी अनेक कलाकार हजेरी लावणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’, ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आहेत. याचबरोबर सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि’. व ’फिनोलेक्स केबल्स लिमिटेड’, ‘भारत फोर्ज लिमिटेड’ असून, ईव्ही पार्टनर ‘एथर’ आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

SCROLL FOR NEXT