Suhana Sakal Swasthyam 2023 : स्वास्थ्यजागरच्या महोत्सवाला सुरुवात, 'त्याग हीच सर्वांत मोठी तपस्या', माधुरी दीक्षितने दिला कानमंत्र

Sakal Swasthyam Program : सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम् च्या आरोग्य महोत्सवाला शुक्रवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. फुलाचा सुगंध, दिव्यांची आरास, रांगोळी, धूप आणि यातून निर्माण झालेली आलौकिक आत्मिक आनंद देणाऱ्या सोहळ्याच्या नव्या पर्वाची नांदी झाली.
Suhana Sakal Swasthyam 2023
Suhana Sakal Swasthyam 2023Saam Tv
Published On

Global Swasthyam 2023 :

सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम् च्या आरोग्य महोत्सवाला शुक्रवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. फुलाचा सुगंध, दिव्यांची आरास, रांगोळी, धूप आणि यातून निर्माण झालेली आलौकिक आत्मिक आनंद देणाऱ्या सोहळ्याच्या नव्या पर्वाची नांदी झाली.

स्वास्थ्यम् हा आरोग्य महोत्सव असून यंदा त्याचे दुसरे वर्ष. या कार्यक्रमाला पुणेकरांना उदंड प्रतिसाद दिला. पहाटे पाचच्या सुमारास आध्यात्मिक व योग गुरु श्री एम यांच्या आगमनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Suhana Sakal Swasthyam 2023
#Shorts : Sakal Swasthyam : Pune : सायकलिंग हा अतिशय उत्तम उपक्रम Milind Joshi यांची प्रतिक्रिया!

त्यांच्या पाठोपाठ ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालक मृणाल पवार, विश्व फाउंडेशनचे प्रमुख पुरुषोत्तम राजिमवाले महाराज आणि प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम व्यासपीठावर उपस्थित होते.

Suhana Sakal Swasthyam 2023
Suhana Sakal Swasthyam 2023: स्वास्थ्यम् मध्ये लेखक- वाचकांचा होणार संवाद, कधी आणि कुठे? जाणून घ्या

या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक सुहाना मसाले, तर पॉवर्ड बाय प्रायोजक भारती विद्यापीठ, फायनान्शियल हेल्थ पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ली.(मल्टिस्टेट), ऊर्जा पार्टनर निरामय वेलनेस सेंटर, हेल्थ पार्टनर शारंगधर नॅचरल हेल्थ केअर आहेत.

आध्यात्मिक गुरु श्री एम. म्हणातात की, त्याग हीच सर्वांत मोठी तपस्या आहे. तपस्येचा अर्थ आध्यात्मिक उष्मा असा होतो. खरेतर कर्मयोग ही तपस्या आहे. विचारांची उत्पत्ती कशी होते? भाषा येत नसेल तर... किंवा भाषेनुसार विचार बदलतात का? असे प्रश्न अभिजित पवार यांनी विचारले. प्रत्येक व्यक्ती कोणत्यातरी भाषेत चिंतन करत असते. ती भाषा त्याला जन्माने मिळते किंवा शिकलेली तरी असते.

Suhana Sakal Swasthyam 2023
Suhana Sakal Swasthyam : 'स्वास्थ्यम् सकाळ'चा आरोग्यमेळा! माधुरी दीक्षित साधणार संवाद, कधी व कुठे?

यानंतर माधुरी दीक्षितने आरोग्यासोबतच (Health) नात्यावरही धडा दिला. वैवाहिक (Marriage) जीवनात नवरा बायको या दोघांचेही जीवनातील ध्येय एकच असते. ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग वेगळे असू शकतात. परंतु, ते दोन्ही मार्ग आयुष्याच्या एका टप्प्यावर एकत्र येतात. त्यामुळे जबाबदाऱ्याच्या लक्षात घेऊन कायम एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे सांगत अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने (Madhuri Dixit) यांनी नात्यातील हळवी गुंफण उलगडली. तर नाते अधिक घट्ट करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ देणे ही गरजेचे आहे.असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी दिला.

ते म्हणाले की, व्यायामाबरोबरच मानसिक आरोग्य, आहार यावर लक्ष देणे गरजेच, मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करावी. ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो त्या गोष्टी करा. तसेच कौशल्य आणि आवड या दोन्हीकडे पाहायला हवे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com