Suhana Sakal Swasthyam 2023: पुण्यात उद्यापासून आरोग्याचा महाजागर! 'स्वास्थ्यम्' मध्ये मानसिक तणावावर होणार चर्चा

Suhana Sakal Swasthyam: वाचकांच्या मानसिक, शारीरिक विकासासाठी सकाळ प्रस्तुत 'सुहाना स्वास्थम महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात तज्ज्ञ लेखकांकडून शारिरीक, मानसिक आणि आत्मिक विकासाचे रहस्य जाणून घेण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
Suhana Sakal Swasthyam
Suhana Sakal SwasthyamSaam Tv
Published On

Suhana Sakal Swasthyam 2023:

प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी निरोगी शरीर, उत्तम मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकणे, वाचणे आणि आत्मसात करणे खूप जास्त महत्त्वाचे असते. शारीरिक आरोग्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. आहारात बदल करतो. तसेचबदल हे मानसिक आोरोग्यासाठी करायचे असतात.

वाचकांच्या मानसिक, शारीरिक विकासासाठी सकाळ प्रस्तुत 'सुहाना स्वास्थम महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात तज्ज्ञ लेखकांकडून शारिरीक, मानसिक आणि आत्मिक विकासाचे रहस्य जाणून घेण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.

यासाठी या महोत्सवात अनेक आरोग्यासंबंधित अनेक तज्ज्ञांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच आरोग्यासाठी उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरणाऱ्या पुस्तकांचे भव्य दालन 'क्रॉसवर्ड' तर्फे तयार करण्यात येणार आहे.

या महोत्सवात सकाळ प्रकाशना तर्फे स्वास्थ्य आणि आत्मिक प्रगतीसाठी सहा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकांच्या लेखकांशी वाचकांना संवाद साधता येणार आहे. यावेळी मानसशास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. प्रतिभा देशपांडे, योगतज्ज्ञ देवयानी एम., रेडिओलॉजिस्ट श्वेता भारती, लेखिका डॉ. सीमा सोनीस आणि रिटा दाते या तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे.

Suhana Sakal Swasthyam
Tata Tech IPO Listing : टाटा टेकच्या IPO मुळे गुंतवणूकदार मालामाल; किरकोळ गुंतवणुकीवर काही तासांत लाखोंची कमाई

या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), डॉ. श्रीराम नेने उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. या उपक्रमाचे मुख्य मुख्य प्रायोजक सुहाना मसाले, तर पॉवर्ड बाय प्रायोजक भारती विद्यापीठ, फायनान्शियल हेल्थ पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट), ऊर्जा पार्टनर म्हणून निरामय वेलनेस सेंटर, हेल्थ पार्टनर शारंगधर नॅचरल हेल्थ केअर आहेत. तसेच सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि व फिनोलेक्स केबल्स लिमिटेड असून, ईव्ही पार्टनर एथर आहेत.

  • तारीख- १ डिसेंबर २०२३

  • स्थळ- पंडित फार्म्स, डी पी रोड, कर्वे नगर, पुणे

  • वेळ - सध्यांकाळी ५- ५.३०

  • विषय : उपचाराचा सुसंवाद: निरोगी मन आणि शरीरासाठी संस्कृत मंत्रांचे अन्वेषण करणे (Harmony of Healing: Exploring Sanskrit Chants for a Healthy Mind and Body)

  • पाहुणे- गेया संस्कृत, वैदिक जप सादर करण्यासाठी सौरभ गोडबोले, निखिल घोरपडकर

Suhana Sakal Swasthyam
Free Food Grains: गरिबांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पुढील ५ वर्षे मिळणार मोफत अन्नधान्य
  • वेळ- संध्याकाळी ५.३० ते ६.००

  • विषय- स्वास्थ्यम् बुक लाँच- स्वास्थ्यमचे अनावरण: समग्र कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंगमध्ये एक प्रवास (Swasthyam Book Launch – Swasthyam Unveiled: A Journey into Holistic Well-being and Mindful Living)

  • वेळ- संध्याकाळी ६.३० ते ८.००

  • विषय- उपनिषदांवर चर्चा (सत्र I) (A Talk on Upanishads (Session I)

  • पाहुणे- श्री एम (योगी, अध्यातमिक गुरू)

  • वेळ - रात्री ८.३०- ९.३०

  • पंचक चित्रपटाचे प्रमोशनसाठी माधुरी नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांच्याशी संवाद (In Conversation with Madhuri and Dr Shriram Nene and promotion of movie “Panchak”)

Suhana Sakal Swasthyam
December Monthly Horoscope 2023: शेवटच्या महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण! करिअरमध्ये प्रमोशन, लागेल लॉटरी; तुमची रास यात आहे का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com