Winter Health Care
Winter Health CareSaam Tv

Winter Health Care : हिवाळ्यात अंथरुण सोडावेसे वाटत नाही? सतत आळस येतो? या गोष्टींचा आहारात समावेश करा

Tired in winter : हिवाळा म्हटलं की, सर्वत्र गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतो. या दिवसात आरोग्याच्या अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. ऋतूमानाच्या बदलानुसार शरीरात सतत आळस येतो, अंथरुण सोडावेसे वाटत नाही.
Published on

Winter Fatigue issue :

हिवाळा म्हटलं की, सर्वत्र गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतो. या दिवसात आरोग्याच्या अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. ऋतूमानाच्या बदलानुसार शरीरात सतत आळस येतो, अंथरुण सोडावेसे वाटत नाही.

या काळात शरीराला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही. तसेच शरीराचे सॅर्कडियन रिदम बिघडते. त्यामुळे सुस्ती येऊन ऊर्जा पातळी खूप कमी होऊ लागते. कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी कमी होऊ लागते. यामुळे सतत थकवा येऊन मूडही खराब होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिवाळ्यात (Winter Season) काही लोकांना अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. त्यामुळे शरीरात आळसपणा वाढू लागतो. यासाठी नियमितपणे सकस आहाराचा (Food) समावेश केल्यास ऊर्जेची पातळी वाढून तुमचा मूडही सुधारेल. तसेच शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्स (Vitamins), मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी कोणत्या सूपरफूड्स आहारात समावेश करायला हवा हे जाणून घ्या.

Winter Health Care
Brain Health : रोजच्या या सवयींमुळे मेंदूवर होतो परिणाम, ताण कमी करण्यासाठी या गोष्टी करुन पाहाच

1. ब्लूबेरी

अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असेलील ब्लूबेरी. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. तसेच मेंदूचे कार्य देखील सुरळीत होते. ज्यामुळे शरीरात ऊर्जेची पातळी देखील वाढते.

2. पालक

पालकमध्ये आयन असते. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. त्यामुळे चयापचय सुधारते. यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.

3. क्विनोआ

क्विनोआमध्ये प्रोटीन अधिक असते. ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. यामुळे तुम्हाला आळस आणि सुस्तीचा सामना करावा लागणार नाही.

Winter Health Care
High Blood Pressure : सायलेंट किलरचा आजार हाय बीपी! झोपेतून उठताच ही लक्षणे दिसल्यास घ्या काळजी...

4. चिया सीड्स

ओमेगा -३ फॅटी ऍसिड आणि व्हॅटिमिन डी समृद्ध, सॅल्मन मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. यामुळे शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढते. झोप देखील सुधारते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com