How To Control Blood Sugar Level Know in Marathi Saam TV
लाईफस्टाईल

Blood Sugar Control Diet: उन्हाळ्यात डायबिटीज वाढतोय? आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा, साखर नियंत्रीत राहिल

Diabetes Control Tips in Marathi: उन्हाळ्यामध्ये तुमच्या रक्तातील साखर वाढत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही पदार्थांची यादी बनवली आहे. यामुळे तुमची डायबिटीज नियंत्रीत राहिल.

Ruchika Jadhav

मधुमेह हा असा आजार आहे जो सध्या १०० पैकी ८० व्यक्तींमध्ये हमखास आढळतोय. मधुमेह आजाराला सायलंट किलर देखील म्हणतात. तुम्हाला देखील मधुमेह असेल तर त्यावर रोज एक गोळी खाण्यापेक्षा आहारात बदल करा. उन्हाळ्यामध्ये तुमच्या रक्तातील साखर वाढत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही पदार्थांची यादी बनवली आहे. यामुळे तुमची डायबिटीज नियंत्रीत राहिल.

टोमॅटो

लालबुंद टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं अँटी-ऑक्सिडंट आढळतं. यामुळे आपल्या शरिरातील साखरेची पातळी नियंत्रीत राहते. उन्हाळ्यात साखर जास्त वाढली असेल तर रोज एक कच्चा लाल टोमॅटो खा.

अ‍ॅवोकॅडो

अ‍ॅवोकॅडो या फळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि फायबर तसेच पोटॅशियम देखील असते. त्याच्या सेवनाने डायबिटीज पेशंटच्या रक्तातील इन्सुलिन वाढते. त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात डायबिटीज पेशंटने अ‍ॅवोकॅडो फळ अठवड्यातून एकदा तरी खावे.

काकडी

काकडीमध्ये कार्बोहाइड्रेट कमी आणि कॅलरी जास्त असते. जेवणात सर्व पदार्थांसह उन्हाळ्यात काकडी आवश्य खावी. त्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. तसेच शुगर देखील नियंत्रणात राहते.

फरसबी

फरसबीच्या हिरव्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटॅमीन आणि मिनरल असतं. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर देखील फरसबीच्या शेंगा खाल्ल्यास किंवा त्याचा ज्यूस प्यायल्यास उन्हाळ्यात रक्तातली साखर वाढत नाही.

घोसाळे

घोसाळ्यात मुबलक प्रमाणात जिवनसत्व असतं. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने घोसाळ्याची भाजी डायबिटीज असलेल्या रुग्णांनी आवश्य खावी. या भाजीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सीएनजीनं काढला घाम, रिक्षाचालक रांगेत, प्रवासी प्रतिक्षेत

भावासाठी ठाकरेंचा काँग्रेसवर घाव, बिहार निवडणुकीत राज नव्हते तरीही हार

Shocking: बेळगावात भयंकर घडलं! घरातलं ऑक्सिजनचं संपलं, शेकोटीनं घेतला तिघांचा जीव

Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT