Health Tips, PCOS Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : पीसीओएसमध्ये या गोष्टी चुकूनही खाऊ नका, अन्यथा बिघेडल आरोग्य !

पीसीओएस ग्रस्त असाल, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

कोमल दामुद्रे

Health Tips : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा महिलांमधील अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, हार्मोनल अडथळे यांच्याशी संबंधित गंभीर आजार आहे.

एनसीबीआयच्या अहवालानुसार, जगातील ४-२० टक्के महिला पीसीओएसने ग्रस्त आहेत. पीसीओएस असलेल्या महिलांना टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय समस्या आणि एंडोमेट्रियल कर्करोग होण्याचा धोका इतर स्त्रियांपेक्षा जास्त असतो.

जर तुम्ही पीसीओएस ग्रस्त असाल, तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची (Health) अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पीसीओएसच्या आजारवर सध्या कोणत्याही प्रकारचे औषधे उपलब्ध नाही.

होमिओपॅथी डॉक्टर स्मिता भोईर पाटील यांनी अलीकडेच पीसीओएसशी लढा देत असलेल्या महिलांसाठी इन्स्टा वर आहार टिप्स शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये ती लिहिते की, जर आपल्याला पीसीओएसचा त्रास होत असेल तर काही पदार्थांचे सेवन बंद करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

१. मिठाई खाऊ नका -

Sweets

अतिप्रमाणात साखर (Sugar) खाल्ल्याने इंसुलिनचे प्रमाणात शरीरात वाढते. अशा वेळी आहारत साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवायला हवे.

२. फळांचा रसाचे सेवन टाळा

Fruit Juice

फळांच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ते उच्च इन्सुलिनयुक्त खाद्यपदार्थ मानले जाते. त्यामुळे पीसीओएस मध्ये ते टाळावे.

३. प्रक्रिया केलेले अन्न टाळावे -

processed food

पीसीओएस ग्रस्त लोकांसाठी प्रक्रिया केलेले अन्न किंवा तळलेले पदार्थ टाळावे. यामुळे शरीरात जळजळ वाढतात. त्यामुळे प्रक्रिया केलेले पदार्थ, मांस यांपासून दूर रहा आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् समृध्द पदार्थांचा समावेश करा त्यामुळे दाह कमी करण्यास मदत करतील.

४. दुग्धजन्य पदार्थ टाळा -

Milk Product

पीसीओएसच्या ग्रस्त महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो नाही, कारण ते अत्यंत इस्ट्रोजेनिक अन्न मानले जाते. यामध्ये IGF-1 - इन्सुलिन सारखी वाढ घटक देखील आहे, जो एंड्रोजन हार्मोन्सचे उत्पादन वाढवण्याचे काम करतो. जे आधीच पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये जास्त आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ घेणे टाळा.

५. बेकरी पदार्थाचे टाळा -

Bakery Product

मैद्यांच्या पदार्थांमध्ये इंसुलिनचा प्रतिकार वाढण्याची क्षमता असते त्यामुळे पीसीओएस लक्षणे बिघडतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला पीसीओएसचा त्रास होत असेल तर बेकरी उत्पादनांचे सेवन करू नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT