How to Postpone Periods: या पदार्थांचे सेवन करणे टाळा, सणासुदीच्या काळात मासिक पाळीला बाय- बाय करा!

मासिक पाळीला सणासुदीच्या काळात कसे टाळाल ?
How to postpone Periods
How to postpone PeriodsSaam Tv

How to postpone Periods : मासिक पाळी हा स्त्रियांच्या शरीरातील असा एक नैसर्गिक बदल आहे. जो प्रत्येक महिन्याला न चुकता येतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे टाळणे किंवा आणणे आपल्याला शक्य नसते.

मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग्स होणं, इरिटेशन, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोटात क्रॅम्प्स येणं, मळमळ, उलटी, चिडचिड या समस्या होणं एकदम साधारण गोष्ट आहे. यातून प्रत्येक स्त्रिला जावंच लागतं. पण बर्‍याच वेळा मासिक पाळी अशा वेळी येते जेव्हा कौटुंबिक मेळावे, सण-समारंभ, सुट्टी किंवा सहलीचे नियोजन करताना बहुतेक मुली किंवा महिला मासिक पाळी पुढे ढकलण्याचा विचार करतात.

मासिक पाळी पुढे ढकलली तर, महत्वाच्या कार्यक्रमांना त्यांना हजेरी लावता येते. मासिक पाळी पुढे जावी यासाठी अनेक महिला किंवा मुली केमिकल टॅब्लेट्स व इतर उपाय करतात. मात्र, प्रत्येकवेळी मासिक पाळी पुढे-मागे ढकलण्यासाठी गोळ्या खाणं चांगलं नसतं. याने आपल्या आरोग्यावर (Health) त्याचा परिणाम होऊ शकतो.

How to postpone Periods
Irregular Periods : मासिक पाळी ४० दिवसानंतर आली ? चिंतेचे कारण की, गंभीर समस्या

जर आपल्याला देखील अशीच समस्या असेल आणि या गोळ्या सतत खाण्याचे टाळायचे असेल तर आपण काही नैसर्गिक मार्गाचा अवलंब करुन ती पुढे ढकलू शकतो. तर जाणून घेऊया असे काही नैसर्गिक मार्ग ज्यामुळे आपल्याला आपली मासिक पाळी पुढे ढकलता येईल.

या पदार्थांचे सेवन करणे टाळा -

१. मसालेदार अन्न खाऊ नका (Don't eat Spicy Food) -

Spicy Food
Spicy FoodCanva

मासिक येण्यापूर्वी आपण काही दिवसाआधीच मसालेदार अन्न पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे. शक्यतो साधे अन्न खा. मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे पोटात उष्णता वाढू शकतो व त्यामुळे मासिक पाळी लवकर येईल. बहुतेकदा असे होते की जर आपल्या पोटात उष्णता असेल तर आपल्याला मासिक पाळी लवकर येते. (Home Remedies For Postpone Periods)

२. लिंबू (Lemon) -

Lemon
LemonCanva

हा सर्वात जुना व घरगुती मार्ग आहे. मासिक पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी लिंबाचा रस मध्यम प्रमाणात घ्यावा. मात्र, आंबट पदार्थ रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करतात असा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. जर तुम्ही हा उपाय वापरून पहात असाल तर एक ग्लास पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा आणि हा रस मासिक पाळी येण्याच्या १ आठवडा आधी प्या.

How to postpone Periods
Hot Flashes : हॉट फ्लॅश ! काय असते हॉट फ्लॅश ? याची लक्षणे काय असतात ? कसे कराल या पासून स्वत:चे संरक्षण ?

३. ओव्याची पानं (Ajwain Leaves) -

Ajwain leaves
Ajwain leavesCanva

ओव्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्व (Vitamins) ब- १२, जीवनसत्त्व के, क आणि ए असते. दोन ओव्याची पाने पाण्यात उकळून थंड झाल्यावर दिवसातून दोनदा सेवन केल्याने आपली मासिक पाळी लांबू शकते आणि शरीरातील अतिरिक्त विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते.

४. जिलेटिन (Gelatin) -

Gelatin
GelatinCanva

जिलेटिन देखील मासिक पाळी उशीरा आणण्यास मदत करते. एक वाटी पाण्यामध्ये जिलेटिनचं पॅकेट व्यवस्थित मिसळून ते पाणी प्या, यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाईल. जिलेटिनमुळे फक्त ३ ते ४ तासांसाठी पीरियड्स टाळू शकता. हे १ पेक्षा अनेक वेळा प्यायल्याने तुम्ही अनेक दिवस पाळी पुढे ढकलू शकता. हा चीन मधील प्राचीन घरगुती उपाय आहे. पण अधिक काळ असे करणे शरीरासाठी घातक देखील ठरू शकते. म्हणून याचा मर्यादेतच वापर करावा.

५. अॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) -

Apple Cider Vinegar
Apple Cider VinegarCanva

अॅप्पल सायडर व्हिनेगर पाळी पुढे ढकलण्यासाठी लाभदायक मानले जाते. यात खूप अ‍ॅसिड असते जे आपली मासिक पाळी १० ते १२ दिवस सहज पुढे ढकलू शकते. पण हे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित नाही. मासिक पाळी येण्याआधी जवळ जवळ १० ते १२ दिवसाआधी २ ते ३ वेळा अ‍ॅप्पल व्हिनेगरचे गरम पाण्यासोबत सेवन केल्यास पाळी आरामात पुढे ढकलता येईल. जर यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली नाही तरी हा उपाय मासिक पाळीतील रक्तस्त्राव व क्रॅम्प्स कमी करण्यास मदत करतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com