Hot Flashes : हॉट फ्लॅश ! काय असते हॉट फ्लॅश ? याची लक्षणे काय असतात ? कसे कराल या पासून स्वत:चे संरक्षण ?

हॉट फ्लॅशेचा परिणाम कसा होतो?
Hot Flashes, Health Tips
Hot Flashes, Health TipsSaam Tv

Hot Flashes : महिलांच्या दैनंदिन जीवनात बरेचसे चढ-उतार होत असतात, तसाच बदल काहीसा त्यांच्या शरीरात सुध्दा होतो. १३-१४ वर्षांपासून आपल्याला मासिक पाळी येण्यास सुरू होते, पण काही वयानुसार तिच्या थांबण्याचा काळ देखील असतो.

१०-१२ महिन्यांपासून मासिक पाळी न येणे यालाच मोनोपॉज (Menopause) म्हणजेच रजोनिवृत्ती असे म्हणतात. शरीरातील स्त्रीबीजग्रंथी (ओव्हरी) वाढत्या वयानुसार काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होते. ही समस्या ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते.

मोनोपॉज सुरू होताना काही सामान्य लक्षणे दिसून येतात. संभोग करताना वेदना होणे, सामान्य तापमान असूनही घाम येणे, झोप पूर्ण न होणे वा झोपच न येणे अशी लक्षणे दिसतात. यादरम्यान शरीरातील हार्मोन्स वेगाने चेंजेस होतात, अशा वेळी शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. यातील एक समस्या म्हणजे हॉट फ्लॅश.

शरीराच्या वरच्या भागात अचानक उष्णतेची भावना, जी सहसा चेहरा, मान आणि छातीवर सर्वात तीव्र असते त्यालाच हॉट फ्लॅश म्हणतात. आपल्याला खूप घाम येतो आणि चेहऱ्यावर लाल ठिपके दिसू लागतात. यादरम्यान लगेचच शरीर थंड पडते त्यामुळे आपण घाबरतो आणि श्वास घेण्यासाठी त्रास होतो. हा त्रास साधारण २ ते ३० मिनिटे होतो, तसेच दिवसातून किंवा हफत्यातून एकदा होऊ शकतो. कधीतरी रात्री अचानक घाम येऊन झोपमोड होऊ शकते. यावरील काही नैसर्गिक उपचार पाहूया

Hot Flashes, Health Tips
Food For Healthy Lungs : सतत जळजळ होतेय ? फुफ्फुसांचा त्रास होतोय? या निरोगी आहारांचा समावेश करा

१. तुमच्या खोलीचे तापमान नेहमी थंड ठेवा.

२. जेवण गरम आणि जेवणात मसालेदार पदार्थ वापरू नका.

३. चहा व कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

४. भरपूर थंड पाणी (Water) प्या आणि सुती कपडे घाला.

५. तूप-तेल (Oil), मैदा, साखर आणि शीतपेयांपासून दूर राहा.

६. आपल्या आहारात कडधान्ये, फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

७. नियमित व्यायाम आणि मॉर्निंग वॉक करा.

ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे, यानंतरही महिला निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतात. जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.या समस्येवर औषधांनीही मात करता येते, परंतु स्वत:च्या इच्छेने कोणतेही औषध घेऊ नका.

रजोनिवृत्तीनंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांना काही शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या वयात ब्रेस्ट आणि एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका वाढतो, म्हणून वर्षातून एकदा मेमोग्राफी, पेल्विक अल्ट्रासाऊंड, पॅप्समीअर टेस्ट करून घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com