High Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure : हाय बिपीमुळे त्रस्त आहात? तर काकडीचा रस प्या, हृदयासाठी ठरेल फायदेशीर !

Cucumber Juice Benefits : काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

कोमल दामुद्रे

Hypertension : काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता.

काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते.

आता हवामानातील बदल दिसून येत असल्याने सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव तर दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास होत असल्याने, अशा वेळेस स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा (Blood Pressure) त्रास खूप जास्त होत असले तर काकडीचा रस बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस पचनासाठीदेखील फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया निरोगी आरोग्यासाठी (Health) काकडीचा रस बनवण्याची सोपी पद्धत काय आहे.

1. काकडीचा रस बनवण्यासाठी साहित्य

  • आले – १/२ इंच तुकडा

  • काकडी – २

  • लिंबू – १/४ स्लाइस

  • हिरवे कोथिंबीर – १ टेबलस्पून

  • पुदिना – १ टेबलस्पून

  • मध – १ टेबलस्पून

  • पाणी (Water) – २ कप

2. कृती

  • काकडची रस बनवण्यासाठी सर्वप्रथम २ काकडी घेऊन बारीक तुकडे करून एका भांड्यात ठेवा.

  • काकडीची साल न काढता तुकडे करायचे आहेत. नंतर कोथिंबीर, आले, आणि पुदिन्याची पाने बारीक चिरून घ्या.

  • आता लिंबू कापून एक चतुर्थांश लिंबाचा रस तयार करून घ्या. त्यानंतर काकडीचे तुकडे, हिरवी कोथिंबीर, पुदिना मिक्सर जारमध्ये ठेवा.

  • आता मिक्सर जारमध्ये आले, लिंबाचा रस टाका किंवा संपूर्ण लिंबूच टाका कारण लिंबाच्या साली मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.

  • आता मिक्सर जारमध्ये २ कप पाणी टाकून एकजीव करून घ्या. आता तयार काकडीचा रस गाळणीने गाळून घ्या.

  • आता एका भांड्यात काकडीचा रस काढून रसाची चव वाढण्यासाठी मध आणि काळे मीठ टाकून सर्व्हिग ग्लासमध्ये सर्व्ह करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT