अचानक डोळे फडफडणे ही समस्या अनेकांना उद्भवते. काही सेकंदापासून ते मिनिटांपर्यंत डोळे फडफडणे सुरू असते आणि नंतर आपोआप थांबते. परंतु डोळे फडफडण्यामागचं नेमकं कारण काय असू शकते. हे भविष्याविषयी काही संकेत देते की कोणत्या आरोग्याचे लक्षण आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डोळे फडफडण्याची समस्या अचानक होते. आपण याकडे शुभ- अशुभ यादृष्टीने पाहतो मात्र डोळे फडफडण्यामागे अनेक गैरसमज आहेत. महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर पुरूषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.
आरोग्यतज्ज्ञानुसार, डोळे फडफडण्यामागे शुभ- अशुभ संकेतच नाही तर आरोग्याच्या देखील समस्या असू शकतात. शरीराशी संबंधित न्यूरो- मुस्कुलर प्रतिक्रिया असू शकते. ज्याला वैद्यकिय भाषेत मायोकाइमिया असे म्हणतात. यापलीकडे ही गंभीर समस्या नसली तरी याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. यानुसार डोळे का फडफडतात यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घ्या.
डोळे फडफडण्यामागचं कारण काय?
आरोग्यतज्ज्ञानुसार, पापण्यांचे स्नायू किंवा डोळ्यांभोवतीच्या चेहऱ्याच्या भागांची अनियंत्रित हालचाल म्हणजे डोळ्यांचे फडफडणे होय. डोळ्यांचे फडफडणे सामान्य असले तरी काही परिस्थितींमध्ये ते शरीरातील एखाद्या समस्येचे लक्षण देखील असू शकते. सामान्यतः, डोळ्यांचे फडफडणे काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंत टिकते आणि ते आपोआप बरे होते. परंतु जेव्हा ते वारंवार होऊ लागते किंवा बराच काळ चालू राहते, तेव्हा ते शरीरातील एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पापण्यांचे स्नायू किंवा डोळ्यांभोवतीच्या चेहऱ्याच्या भागांची अनियंत्रित हालचाल म्हणजे डोळ्यांचे फडफडणे होय. बहुतेक प्रकरणांमध्ये, डोळ्यांचे फडफडणे सामान्य असते, तथापि, काही परिस्थितींमध्ये ते शरीरातील एखाद्या समस्येचे लक्षण देखील असू शकते.
वैद्यकीय अहवालानुसार, आपल्या पापण्या चेहऱ्याच्या नसांद्वारे थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. मेंदू किंवा चेहऱ्याच्या नसांमध्ये कोणताही अडथळा आल्यास डोळ्यांचे फडफडणे सुरू होते. ज्यामुळे मायोकिमिया होतो. डोळे फडफडणे हा काही विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम देखील असू शकतो.
डोळे फडफडण्यामागचे कारण हे थकवा किंवा झोपेची कमतरता, अधिक कॅफीन सेवन, तंबाखू धूम्रपानाचा अतिवापर, डोळ्यांचा कोरडेपणा, तणाव, औषधांचे अतिसेवन, सतत मोबाईल फोन, लॅपटॉप वापरणे किंवा टीव्ही पाहण्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे डोळ्यांचे स्नायू थकतात आणि डोळे फडफडू शकतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.