Low Blood Sugar Saam Tv
लाईफस्टाईल

Low Blood Sugar : अचानक शुगर लेव्हल कमी होतेय ? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच घ्या काळजी

Diabetes : तुम्हाला माहित आहे का की शुगर लेव्हल वाढणे जितके गंभीर आहे तितकेच रक्तातील साखरेची पातळी कमी होणे धोकादायक आहे.

कोमल दामुद्रे

Low Sugar Level Symptoms : बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे मधुमेह या गंभीर आजाराचे प्रमाण वाढला आहे. जर एखाद्याची साखरेची पातळी सतत वाढत असेल तर तो अन्नावर नियंत्रण ठेवून आणि औषध किंवा इन्सुलिनच्या मदतीने नियंत्रण करू शकतो.

पण तुम्हाला माहित आहे का की शुगर लेव्हल वाढणे जितके गंभीर आहे तितकेच रक्तातील साखरेची पातळी कमी होणे धोकादायक आहे. कमी रक्तातील साखरेला हायपोग्लायसेमिया म्हणतात. हा त्रास कुणालाही होऊ शकतो, पण जर तुम्हाला याबद्दल योग्य माहिती असेल, तर तुम्ही लक्षणे दिसू लागल्यावर लगेच उपचार करू शकता. चला जाणून घेऊया कमी रक्तातील साखरेवर (Sugar) नियंत्रण ठेवण्याच्या टिप्स (Tips).

1. कमी रक्तातील साखरेची लक्षणे (Symptoms)

  • रक्तातील साखर कमी झाल्यास डोकेदुखी होते.

  • थरथरणे, चक्कर येणे, भूक, गोंधळ, चिडचिड, हृदयाचे ठोके वाढणे ही देखील कमी साखरेची लक्षणे आहेत.

  • त्वचा पिवळी पडणे, घाम येणे आणि अशक्तपणा

  • या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास झटके देखील येऊ शकतात.

  • रक्तातील साखर कमी असल्यास, त्यावर वेळीच उपचार न केल्यास कोमात जाण्याचा धोका असतो.

2. साखर कमी का होते ?

  • कमी रक्तातील साखर अनेक कारणांमुळे असू शकते.

  • औषधांचा अतिवापर आणि इन्सुलिनच्या इंजेक्शनमुळे साखरेची पातळी कमी होऊ शकते.

  • जर मधुमेही रुग्णांनी अन्न वगळले किंवा कमी अन्न खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखर कमी होऊ शकते.

3. कमी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी टिप्स

1. डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज रक्तातील साखर तपासा.

2. घराबाहेर पडण्यापूर्वी नाश्ता करून बाहेर पडा.

3. रक्तातील साखर कमी असताना कार्बोहायड्रेटयुक्त स्नॅक्स खा.

4. रक्तातील साखर कमी असल्यास ती वाढवण्यासाठी मिठाई, चॉकलेट खाऊ नका. साखर, गूळ, ग्लुकोज पावडरचे सेवन करा.

5. तुम्ही अर्धा कप फ्रूट ज्यूट पिऊ शकता.

6. ओआरएसचे द्रावण प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी असताना ती राखली जाते.

7. एक कप दूध प्या. तुम्ही एक चमचा मध देखील घेऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT