Pickle Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Stuffed Chili Pickle Recipe: भरलेल्या मिरचीचे लोणचं वाढवेल ताटाची शान, जाणून घ्या चविष्ट रेसीपी

Home Made Mirchi Pickle: लोणचं म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. बरेच लोकांना नुस्त लोणचं खायला सुद्धा फार आवडते.

कोमल दामुद्रे

Pickle Recipe : लोणचं म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. बरेच लोकांना नुस्त लोणचं खायला सुद्धा फार आवडते. अशातच डाळभात असो किंवा खिचडीचा भात लोणच्याशिवाय जेवणाला मज्जाच नाही.

आपल्या भारतामध्ये (India) लोणचं खाण्याचे बरेच शौकीन आहेत. चटक मटक लोणच्यासोबत पापड, डाळ भात खाण्याची मज्जा काही औरचं असते. अशातच अनेक प्रकारची लोणची बाजारामध्ये उपलब्ध आहेत. कैरीपासून ते आवळापर्यंत अनेक प्रकारची लोणची आहेत. अशातच मिरचीचे भरलेले लोणचे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या मिरचीच्या भरलेल्या लोणच्याची रेसिपी.

मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी मोठ्या आकाराची मिरची वापरतात. त्याचबरोबर हे लोणचे खाण्यासाठी अतीशय उत्तम असते. चपाती, पराठे त्याचबरोबर भातासोबत देखील या मिरचीचे भरलेलं लोणचे खूप चविष्ट लागते.

साहित्य

  • वीस हिरव्या मिरच्या

  • एक कप बडीशेप

  • एक कप धणे

  • एक चमचा आमचूर पावडर

  • एक चमचा मीठ

  • एक कप बेसन

  • सहा लाल मिरच्या

  • एक कप तेल (Oil)

कृती :

  1. सर्वप्रथम मोठ्या हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने (Water) धुवून घ्या.

  2. त्यानंतर ओल्या मिरच्या एका कपड्याच्या सहाय्याने पुसून घ्या.

  3. आता हिरव्या मिरचीला मधोमध सुरीच्या सहाय्याने चिर पाडा आणि मिरची मधील सर्व बिया काढून टाका.

  4. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीत बियाही ठेवू शकता. आता सामग्रीनुसार एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन चाळून घ्या.

  5. त्यानंतर तवा गॅसवर ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप टाका आणि बेसन टाकून परतून घ्या.

  6. थोड्या वेळाने बेसनाचा रंग बदलेल आणि बेसनाचा खमंग दरवळेल. त्यानंतर बेसन एका प्लेटमध्ये काढून घ्या.

  7. त्यानंतर तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून सगळे मसाले जसे - बडीशेप, धणे, लाल मिरची सगळ टाकून चांगलं परतून घ्या.

  8. मसाले परतून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. मसाला थंड झाल्यावर कापलेल्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्या. आता तव्यावर पुन्हा तेल टाकून चांगल गरम करून घ्या.

  9. जेव्हा तेलामधून धूर येऊ लागेल तेव्हा तेलामध्ये मिरच्या सोडा आणि चांगल्या फ्राय करून घ्या. तुमचा हिरव्या मिरचीचं भरलेलं लोणचं तयार आहे.

  10. डाळभात असो किंवा खिचडीचा भात लोणच्याशिवाय जेवणाला मज्जाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT