Stroke Warning Signs Saam Tv
लाईफस्टाईल

Stroke Warning Signs : स्ट्रोक आल्यानंतर या गोष्टी लगेच करा, वाचू शकतो रुग्णाचा जीव

Stroke Treatment : एखाद्याला स्ट्रोक आल्यानंतर त्वरीत कोणत्या गोष्टी करायला हव्या हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Stroke Signs First Aid Treatment :

मेंदू हा आपल्या शरीराचा मुख्य अवयव. आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत करण्याचे काम हे मेंदूपासून होते. मेंदूला चालना मिळाल्यानंतरच आपल्या शरीराच्या इतर हालचाली सुरु होतात.

परंतु,अनेक आजारांमध्ये गंभीर आजार आहे स्ट्रोक. स्ट्रोकमध्ये मेंदूचा रक्तप्रवाह थांबतो. हिवाळ्यात (Winter Season) पक्षाघाताचा धोका अधिक प्रमाणात असतो. जर एखाद्याला स्ट्रोक आल्यानंतर त्वरीत कोणत्या गोष्टी करायला हव्या हे जाणून घेऊया. जितक्या लवकर यावर उपचार मिळतील तितक्या लवकर रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. स्ट्रोक आल्यानंतर लक्षणे कशी दिसतात?

  • रुग्ण हात वर करु शकत नाही

  • निस्तेज चेहरा

  • बोलता न येणे आणि अडखळत असल्याची भावना

  • धूसर दिसणे

  • शरीरात सुन्नपणा जाणवणे

2. स्ट्रोक आल्यानंतर काय करावे?

  • स्ट्रोकची लक्षणे (Symptoms) दिसल्यास रुग्णाला प्रथम झोपायला लावा. त्याच्या डोक्याला आणि खांद्याला उशीने आधार द्या.

  • स्ट्रोकची लक्षणे दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. ज्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेता येईल.

  • रुग्णाला अति घाम किंवा बैचेन वाटत असेल तर सैल कपडे परिधान करायला सांगा. ज्यामुळे मोकळा श्वास घेण्यास मदत होईल, तसेच त्याची अस्वस्थता देखील कमी होऊ शकेल.

  • रुग्णाला स्ट्रोक कोणत्या वेळी आला याची नोंद ठेवा. ज्यामुळे स्ट्रोकच्या रुग्णाला क्लॉट बस्टिंग औषध (Medicine) दिले जाते. ज्यामुळे जीव वाचण्यास मदत होते.

  • स्ट्रोकच्या बहुतेक रुग्णांना सीपीआरची गरज नसली तरी, व्यक्ती बेशुद्ध पडल्यावर त्याच्या हृदयाचे ठोके तपासा. ठोक्यांची हालचाल कमी झाल्यास त्यांना सीपीआर देण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT