Maharashtra Politics: छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात राजकीय उलथापालथ; पाहा VIDEO

Yeola Municipal Election Updates 2025: येवला आणि मनमाड नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला शरद पवार गटाने दिलेल्या पाठिंब्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला आणि मनमाड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या येवला नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ मिळाली आहे. यामुळे येवला येथे भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाविरोधात शिवसेना शिंदे गट आघाडीवर राहण्याची शक्यता वाढली आहे. येवला नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे रुपेश दराडे यांना शरद पवार गटाने अधिकृत पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळांना विरोध म्हणून सुहास कांदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून मोठा राजकीय डाव साधला आहे.

मनमाड नगरपरिषदेलाही राजकीय नाट्यमयतेची झळ बसत आहे. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवार न देता निवडणुकीपासून दूर राहिल्याने चर्चा रंगत आहे. यामुळे अपक्ष उमेदवार गणेश धात्रक यांना अजित पवार गटाचा बाहेरून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. या वेळी अजित पवार गटाने उमेदवारी न दिल्याने भुजबळ-कांदे समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ दिसत आहे. या सगळ्या हालचालींमुळे येवला आणि मनमाडच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत. राजकीय मित्र-शत्रूंच्या बदलत्या समीकरणांमुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल घडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com