Simple Diet Tips to Keep Bones Healthy and Strong Saam
लाईफस्टाईल

तारूण्यातच हाडं खिळखळी? कंबर अन् गुडघेदुखीनं त्रस्त? खा १ पदार्थ, कॅल्शियमचा सुपरडोस

Simple Diet Tips to Keep Bones Healthy and Strong: हाडे मजबूत ठेवण्यासाठी पालेभाज्या, रताळे अन् अंजीर खा. या ३ पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच पोटॅशियमसारखे घटक असतात.

Bhagyashree Kamble

  • हाडे मजबूत ठेवण्यासाठी ३ पदार्थ खा.

  • आहारात पालेभाज्या, रताळे आणि अंजीर यांचा समावेश.

  • हा पदार्थांमुळे शरीराला पोषण मिळते.

धावपळीच्या जीवनात लोक अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ऑफिसच्या कामाच्या व्यापामुळे आणि वैयक्तिक जीवनामुळे लोकांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. बरेच लोकांकडून जेवण स्किप होतं. वेळेवर न जेवल्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. तसेच हाडंही कमकुवत होतात. वाढत्या वयानुसार, कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास होतो. जर, वेळेवर काळजी घेतली नाही तर, ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर समस्या उद्धभवू शकतात. जर, हाडांच्या दुखण्यांचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर, आहारात या ३ पदार्थांचा समावेश करा.

कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी आजपासून आपल्या आहारात ३ पदार्थांचा समावेश करा. यामुळे फक्त हाडं नसून, शरीर सुदृढ राहिल. तसेच हाडांची दुखणी दूर होतील.

हिरव्या पालेभाज्या

वेब एमडीच्या रिपोर्टनुसार, हिरव्या पालेभाज्या हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात. पालक, कोबी, मेथी, अशा हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत असते. शिजवलेल्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये अंदाजे २०० मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे आजपासून हिरव्या पालेभाज्या खायला सुरूवात करा.

रताळे

रताळे केवळ स्वादिष्ट नसतात, तर हाडे मजबूत करण्यासही मदत करतात. त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

अंजीर

आपल्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असते. कोणत्याही ऋतूमध्ये अंजीर खाऊ शकता. प्रत्येक ऋतूमध्ये बाजारात अंजीर मिळते. अंजीरमध्ये १२१मिलीग्राम कॅल्शियम असते. ते केवळ हाडे मजबूत करत नाहीत. तर, यातून भरपूर उर्जा देखील मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT