Kitchen Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : फ्रीजचा वापर न करता टोमॅटोला अशाप्रकारे करा स्टोर, राहातील एकदम फ्रेश !

Kitchen Tips : तुमच्याकडे फ्रीज नसेल तर एकाच वेळी खूप टोमॅटो खरेदी करणे म्हणजे पैशाचा अपव्यय ठरू शकतो.

कोमल दामुद्रे

How To Store Tomatoes : टोमॅटो हे ताज्या भाज्यांपैकी एक आहे. परंतु, बाजारात गेल्यानंतर अनेकदा आपण आठवड्याभराच्या भाज्या, टोमॅटो एकदाच खरेदी करतो व त्या फ्रीजमध्ये ठेवतो.

पण जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर एकाच वेळी खूप टोमॅटो खरेदी करणे म्हणजे पैशाचा अपव्यय ठरू शकतो. कारण उघड्यावर ठेवलेले टोमॅटो लवकर सडू लागतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला फ्रीजशिवायही बराच काळ ताजे टोमॅटो अधिक काळ साठवायचे कसे याबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल

1. टोमॅटो साठवण्याची पहिली कृती

  • अर्धा चमचा मीठ आणि हळद (Turmeric) मिसळून पाण्यात टोमॅटो काही मिनिटे भिजत राहू द्या.

  • आता ते बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने (Water) धुवा आणि पुसून टाका.

  • नंतर कोरड्या कापडाने ते पूर्णपणे वाळवा.

  • उघड्या भांड्यात साधा कागद पसरवा आणि टोमॅटो कागदात गुंडाळा आणि बाजूला ठेवा.

  • आता हे भांडे कॅबिनेटमध्ये ठेवून, टोमॅटो आठवडे वापरता येतील.

2. टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी हे करा

  • टोमॅटो मातीत ठेवूनही बराच काळ ताजे ठेवता येते. वास्तविक, जमिनीवर बाह्य तापमानाचा प्रभाव खूपच कमी असतो, त्यामुळे टोमॅटो बराच काळ ताजे राहतात.

  • यासाठी एका डब्यात कोरडी माती टाकून त्यात टोमॅटो दाबून ठेवा. मग ते बाहेर काढा आणि दररोज वापरा. पण ते काढताना तुमचा हात नेहमी कोरडा असावा हे लक्षात ठेवा. ते दाबताना टोमॅटो नीट पुसून घ्या.

Kitchen Hacks

3. फ्रीजशिवाय टोमॅटो कसे साठवाल ?

  • टोमॅटो (Tomato) जास्त काळ फ्रीज न ठेवता ताजे ठेवण्यासाठी तुम्ही पानांचा देखील वापरू शकता.

  • यासाठी टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने वाळवून त्यात ठेवावे.

  • ते एका उघड्या बॉक्समध्ये ठेवा आणि आठवड्यातून एकदा काही मिनिटांसाठी हलका सूर्यप्रकाश दाखवा. यामुळे टोमॅटो लवकर खराब होत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reetha- Shikakai Hairpack: केस गळण्याची समस्या झटक्यात होईल दूर, एकदा लावून पाहा रिठा- शिकेकाईचा हेअर पॅक, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

Maharashtra News Live Update: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

New Labour Code: नवीन कामगार कायदा लागू; पगारापासून ते PF वर होणार परिणाम; वाचा सविस्तर

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

SCROLL FOR NEXT