mint chutney recipe google
लाईफस्टाईल

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

Mint Chutney: वरण भाताला साथ देणारी झणझणीत लसणाची आणि ताजी पुदिन्याची चटणी करून बघा. या दोन चटण्या चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकालाच जेवणाच्या ताटात चटणी असलेली आवडते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात विविध प्रकारच्या आणि विविध पद्धतीच्या चटण्या बनवल्या जातात. आज आपण अशाच दोन चटण्यांच्या झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी जाणून घेणार आहोत. एक झणझणीत लसणाची चटणी आणि दुसरी चटकदार पुदीन्याची चटणी रेसिपी. या दोन्ही चटण्या फक्त चवीलाच नाहीतर पचनासाठीही खूप फायदेशीर आहेत.

पुदिना चटणीची रेसिपी

साहित्य

कोथिंबीर – १ कप

पुदीना – अर्धा कप

हरी मिरची – २ ते ३

आलं – १ इंच तुकडा

जीरे – अर्धा चमचा

मीठ आणि काळं मीठ – चवीनुसार

लिंबाचा रस – १ मोठा चमचा

थोडंसं पाणी

कृती

सर्वप्रथम कोथिंबीर आणि पुदीन्याची पानं स्वच्छ धुऊन घ्या. आता मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, जीरे, मीठ, काळं मीठ आणि लिंबाचा रस घाला. थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्या. चटणी स्मूद आणि घट्ट होईल इतपतच पाणी वापरा. हवे असल्यास त्यात थोडं तेल टाकल्याने रंग अधिक काळ ताजा राहतो. तुमची ताजी, चविष्ट धनिया-पुदिना चटणी तयार आहे. जी तुम्ही फक्त वरण भातासोबत खाऊ शकता.

लसणाच्या चटणीची रेसिपी

साहित्य

लसूण पाकळ्या – ८ ते १०

सफेद तीळ – २ मोठे चमचे

शेंगदाणे – २ मोठे चमचे

सुक्या लाल मिरच्या – २ ते ३

जीरे – अर्धा चमचा

मीठ – चवीनुसार

लिंबाचा रस – १ मोठा चमचा

तेल – १ मोठा चमचा

कृती

सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि लाल मिरच्या टाका. नंतर भुईमूग आणि तीळ घालून सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यात लसूण पाकळ्या टाकून २-३ मिनिटे परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून त्यात मीठ आणि लिंबाचा रस मिसळा.

हे सर्व बारीक वाटून घ्या. तुम्हाला हवे असल्यास थोडं पाणी टाकून पेस्ट बनवू शकता. ही मसालेदार लसूण चटणी तयार आहे. ती हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवली, तर काही दिवस चांगली टिकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT