Monsoon Energy Drinks SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Energy Drinks : पावसाळ्यात हे एकदा ट्राय करून बघा! चहा-कॉफीला कराल टाटा, बाय-बाय!

Shreya Maskar

पावसाची एक सर येताच आपण ओलेचिंब होऊन जातो. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच पावसात अनेक संसर्गाचा धोकाही वाढतो. अशात शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपण वारंवार चहा कॉफीचा आस्वाद घेतो. पण जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन केल्यास ॲसिडीटीची समस्या उद्भवते. त्यामुळे पावसात चहा कॉफी पिणे टाळा. शरीराला ऊर्जा देणाऱ्या आणि आजारांपासून आपले संरक्षण करणाऱ्या 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन करा.

आयुर्वेदिक काढा

आयुर्वेदिक काढा पावसात संजीवनी बूटी सारखे काम करतो. आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यामध्ये आले, लवंग, वेलची, दालचिनी, गवती चहा , तुळस इत्यादी पदार्थ घालून छान उकळवून घ्यावे. हा तयार झालेला गरमागरम काढा प्यायल्यास पावसात शरीराला ऊर्जा मिळेल. तसेच खोकला आणि घसा दुखत असल्यास काढा रामबाण उपाय आहे. दिवसातून २ वेळा या काढ्याचे सेवन करा आणि पावसात आरोग्य जपा.

भाज्यांचे सूप

पावसात निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करावा. तसेच पावसात भाज्यांचे सूप देखील शरीराला ऊर्जा देते. भाज्यांचे सूप बनवण्यासाठी बीट, गाजर, मटार, भोपळा, कोबी , मुळा, पालक, कोथिंबीर आणि मक्याचे दाणे कूकरमध्ये छान उकडून घ्या. त्यानंतर या भाज्या मिक्सरला वाटून घ्या. या भाज्यांमध्ये चवीसाठी लिंबाचा रस, चाट मसाला, मीठ घालून सर्व छान एकत्र करून घ्यावे. अशाप्रकारे पावसात बाहेरून आल्यावर झटपट शरीराला ऊर्जा देणारे सूप तुम्ही बनवू शकता.

डाळींचे सूप

डाळींमध्ये सर्वात जास्त पौष्टिक तत्व असतात. जी आजारांशी लढण्यास मदत करतात. सर्वप्रकारच्या डाळी एकत्र करून कूकरमध्ये उकडून घ्या. त्यामध्ये आले, लसूण , मीठ थोडे मक्याचे दाणे टाकून छान एकत्र करा. या मिश्रणाला जिऱ्याची फोडणी द्या. डाळीचे पाणी हे डाळींपेक्षा पौष्टिक असते.

हळदीचे दूध

दूध हा शरीराला ऊर्जा देणारा महत्त्वाचा घटक आहे. तर हळद अँटी-बॅक्टेरियलगुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे पावसात घशाला आराम देण्यासाठी आणि थंडाव्यात शरीराला ऊब देण्यासाठी गरमागरम हळदीचे दूध प्यावे. दूधाची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात केशर आणि थोडा गूळही घालू शकता.

हर्बल टी

पावसात काही लोकांचे चहा-कॉफी पिम्यावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे त्यांना ॲसिडीटीचा त्रास होतो. अशावेळी पावसात चहाला पर्याय म्हणून तुम्ही हर्बल टी पिऊ शकता. चवीपुरता साखर, लवंग, वेलची, गवती चहा, चहा पावडर घालून चहा छान उकळून घ्यावा. यात वापरलेल्या मसाल्यांमुळे पावसात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

India Travel: सर्पमित्रांसाठी निसर्गाचा सुंदर नजारा, 'या' ठिकाणाला एकदा भेट द्याच

IND vs BAN: सूर्याचा मास्टरप्लान! पहिल्या सामन्यात या दोघांना पदार्पणाची संधी; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT