केक असा गोड पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. वाढदिवसाची पार्टी असो किंवा अन्य काही फंक्शन. व्यक्ती नेहमी सेलिब्रेशनमध्ये तोंड गोड करण्यासाठी केक खातात. बेकरीमध्ये मिळणारा कॉफी केक अनेकांचा फेवरेट असतो. आता तुम्हाला देखील असा केक खायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी याची सिंपल रेसिपी आणली आहे.
साहित्य
कॉफी पावडर- ४ छोटे चमचे
बेकिंग पावडर- १ छोटा चमचा
व्हिप क्रीम- ४ मोठे चमचे
मीठ- चविनुसार
गरम पाणी- १/२ कप
फ्रेश क्रीम- १ कप
मैदा - २ कप
दही - ३ते४ कप
साखर - १ ते ४ कप
वॅनिला इसेन्स - १ छोटा चमचा
मिल्क चॉकलेट - १ कप
रिफाइंड ऑइल - १/३ कप
अकरोड - १ कप
बेकींग सोडा - १ छोटा चमचा
बटर- २ चमचे
कृती
बेकरीमध्ये बनवतात अगदी तसाच केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्या.
त्यानंतर दह्यात साखर आणि बेकिंग सोडा मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण छान मिक्स कार आणि याच बाउलमध्ये सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
त्यानंतर दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि मिठ मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण छान चाळून घ्या.
त्यासह यामध्ये ३ छोटे चमचे कॉफी पावडर आणि गरम पाणी मिक्स करून घ्या.
आता दह्यात तयार केलेलं मिश्रण घ्या. त्यामध्ये वॅनिला इसेन्स आणि कॉफी लिक्वीड टाकून मिक्स करून घ्या.
मैदा, बेकिंग पावडरच्या मिश्रणात दह्याचं हे मिश्रण टाकून मिक्स करून घ्या.
पुढे यामध्ये रिफाइंड तेल मिक्स करा आणि छान फेटून घ्या.
पुढे तयार बॅटरमध्ये अक्रोड किंवा तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सचे तुकडे मिक्स करून घ्या आणि केक बेक करा.
त्यानंतर एका बाऊलमध्ये फ्रेश क्रिम, बटर, मिल्क चॉकलेट आणि कॉफी पावडर पुन्हा छान फेटून घ्या.
पुढे हे मिश्रण थंड होण्यासाठी एका स्विझ बॉटलमध्ये भरून घ्या.
त्यासह आणखी एक कॉफी क्रिम बनवण्यासाठी व्हिप क्रिममध्ये कॉफी मिक्स करा. ही क्रिम छान फेटून घ्या. यातली आरधी क्रिम फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून घ्या.
त्यानंतर केक बोर्टवर ठेवून त्याचे दोन वेगवेगळे भाग करून घ्या. पुढे यावर सर्व क्रिम लावून तुमच्या आवडीनुसार सेट करून घ्या. तयार झाला बेकरी स्टाइल कॉफी केक.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.