Stomach Problems
Stomach Problems  Saam Tv
लाईफस्टाईल

Stomach Problems : या पदार्थांचे सेवन केल्याने होतील पोटाच्या अनेक समस्या दूर, अपचन व वाढलेले वजनही होईल कमी

कोमल दामुद्रे

Stomach Problems : आपल्या आहारात असे काही पदार्थ आहेत, जे आरोग्य राखण्यासाठी ओळखले जातात. आपण बाहेरचे काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला अपचनांची समस्या होते व पोटदुखीचा त्रास होऊ लागतो.

पोटदुखीचा त्रास हा सामान्य असला तरी, आपण यासाठी डॉक्टरकडे जातो पण काही घरगुती उपायानी देखील ही समस्या आपण सोडवू शकतो. या त्रासावर मात करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात मिळणारा ड्रायफ्रूट्स मधील एक पदार्थ आहे. हे ड्रायफ्रूट्स मनुका.

आरोग्याशी (Health) संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी मनुके खाल्ला जातो. पोटाच्या समस्यांपासून ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी मनुके कसे फायदेशीर (Benefits) होतील ते जाणून घेऊया.

मनुक्याचे आरोग्यास होणारे फायदे

१. मनुका खाल्ल्याने अॅसिडीटीच्या समस्येवर मात करता येते. अॅसिडीटीच्या समस्येवर मनुक्याचे सेवन करावे. ते खाण्यासाठी मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा व सकाळी त्याचे पाणी प्या. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल.

२. मनुका जितका वजन वाढवण्यास फायदेशीर असतो. तितकाच तो वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. वजन वाढवायचे असल्यास रोज ४ ते ५ मनुके दूधात मिसळून खाऊ शकता. यामुळे शरीराचे वजन वाढण्यास मदत होते.

३. वजन कमी करणाऱ्यांना मनुका योग्य प्रकारे कसे सेवन करावे. मनुकामध्ये असलेले ग्लुकोज आणि फ्रुक्टोज वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, परंतु याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

४. अनेक वेळा पोटदुखीची तक्रारीसोबत अपचनाची देखील समस्या असते. पोटातील मल नीट जाण्यासही त्रास होतो. अशा स्थितीत फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेली मनुके पचनक्रिया सुधारण्याचे काम करतात. यामुळे गॅसची समस्याही दूर होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

International Tea Day : चहा बनवताना या चुका टाळा, चव वाढेल

Rahul Gandhi News | 8 वेळा मतदान करणाऱ्याला अटक, राहुल गांधींनी ट्विट केला होता व्हिडीओ

Kyrgyzstan: किर्गिस्तानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांनंतर भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Premature Delivery : वेळेआधी बाळ जन्माला येण्याची लक्षणे आणि कारणे काय? वाचा स्त्रीरोग तज्ञांनी सांगितलेली माहिती

Heat Wave : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४६ अंशावर, नंदुरबारच्या तापमानात वाढ

SCROLL FOR NEXT