Stomach cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर की अ‍ॅसिडिटी? दोन्ही समस्यांमधील फरक कसा ओळखाल, शरीरातील बदलांकडे लक्ष द्या

Stomach cancer vs acid reflux: अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे ॲसिडिटी आणि जळजळ.

Surabhi Jayashree Jagdish

  • अॅसिड रिफ्लक्स आणि कॅन्सरमधील फरक ओळखणे महत्त्वाचे आहे.

  • अॅसिड रिफ्लक्समध्ये छातीत जळजळ होते.

  • पोटाच्या कॅन्सरमध्ये वजन अचानक कमी होते.

आजारांची सुरुवातीची लक्षणं ओळखली तर वेळेवर उपचार घेऊन योग्य निर्णय घेणं शक्य होतं. छातीत किंवा पोटात जळजळ होणं, वारंवार अॅसिडिटीचा त्रास जाणवणं ही सर्वसामान्य लक्षणं आहेत. पण अनेकदा लोकांना शंका येते की हा फक्त अॅसिड रिफ्लक्स (अॅसिडिटी) आहे का की यामागे पोटाचा कॅन्सर दडला आहे? कारण काही लक्षणं दोन्ही आजारांमध्ये सारखीच दिसतात. म्हणूनच यातील फरक ओळखणं महत्त्वाचं आहे.

अॅसिड रिफ्लक्स म्हणजे काय?

अॅसिड रिफ्लक्स तेव्हा होतं जेव्हा पोटातील आम्ल परत वर अन्ननलिकेत (घशापासून पोटापर्यंत जाणाऱ्या नलिकेत) येतं. यामुळे छातीत जळजळ होते, ज्याला आपण हार्टबर्न म्हणतो. हा त्रास वारंवार किंवा तीव्र प्रमाणात झाला, तर त्याला जीईआरडी (GERD – Gastroesophageal Reflux Disease) म्हणतात.

अॅसिड रिफ्लक्सची सामान्य लक्षणं

  • छातीत जळजळ

  • आंबट किंवा कडवट ढेकर येणं

  • पोट फुगल्यासारखं वाटणं, वारंवार ढेकर येणं

  • सकाळी घसा बसणे किंवा दुखणे

  • सतत खोकला येणे किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं

अॅसिड रिफ्लक्स हा सर्वसामान्य त्रास आहे. तो जीवनशैलीत बदल आणि साध्या औषधांनी नियंत्रणात ठेवता येतो. मात्र हा त्रास सतत होत राहिला, तर पोटातील अन्ननलिकेला नुकसान होऊ शकतं आणि गंभीर आजार जसं बॅरेट्स इसोफॅगस किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

पोटाचा कॅन्सर म्हणजे काय?

पोटाच्या आतील आवरणात जेव्हा कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात तेव्हा त्याला पोटाचा कॅन्सर किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणतात. हा आजार अॅसिड रिफ्लक्सपेक्षा खूपच गंभीर आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला पोटाच्या कॅन्सरची लक्षणं स्पष्ट दिसत नाहीत.

पोटाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणं

  • भूक न लागणं

  • थोडं खाल्ल्यावरच पोट भरल्यासारखं वाटणे

  • कोणतंही कारण नसताना वजन कमी होणं

  • पोटात वेदना किंवा वरच्या पोटात सतत अस्वस्थता जाणवणं

  • सतत हार्टबर्न किंवा अॅसिडिटी

  • मळमळ होणं, कधी कधी रक्तासह उलटी होणं

  • पोटात सूज येणं किंवा पाणी साचल्यासारखं वाटणं

  • मल काळसर होणं

  • खूप थकवा येणं, शरीर अशक्त वाटणं

ही लक्षणं इतर किरकोळ आजारांमध्येही दिसू शकतात, पण जर ती सतत जाणवत राहिली, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

अॅसिड रिफ्लक्स आणि पोटाच्या कॅन्सरमधला फरक कसा ओळखावा?

काळावधी आणि सातत्य

अॅसिड रिफ्लक्सची लक्षणं येतात आणि जातात. पण पोटाच्या कॅन्सरची लक्षणं सतत राहतात आणि वेळेनुसार अधिक गंभीर होतात.

वजन कमी होणं

अचानक आणि अनपेक्षित वजन घटणं हे पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं, अॅसिड रिफ्लक्समध्ये असं क्वचितच होतं.

भूक आणि पोट भरणं

भूक कमी लागणं किंवा लगेच पोट भरल्यासारखं वाटणं हे पोटाच्या कॅन्सरचे संकेत आहेत.

रक्तस्त्राव

रक्ताची उलटी होणं किंवा मल काळसर होणं हे गंभीर लक्षण असून तातडीने तपासणी आवश्यक आहे.

औषधांचा परिणाम

अॅसिड रिफ्लक्सला साध्या औषधांनी आराम मिळतो पण पोटाच्या कॅन्सरमध्ये लक्षणं औषधांनी कमी होत नाहीत.

अॅसिड रिफ्लक्स म्हणजे काय?

पोटाचे आम्ल घसात येऊन छातीत जळजळ होणे म्हणजे अॅसिड रिफ्लक्स.

पोटाच्या कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

भूक न लागणे, वजन कमी होणे आणि पोट भरल्यासारखं वाटणे.

अॅसिड रिफ्लक्स आणि कॅन्सरमधील मुख्य फरक कोणता?

अॅसिड रिफ्लक्समध्ये औषधांनी आराम मिळतो, कॅन्सरमध्ये नाही.

वजन अचानक कमी होणे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

वजन अचानक कमी होणे पोटाच्या कॅन्सरचे लक्षण आहे.

रक्ताची उलटी किंवा काळा मल कोणत्या गंभीर आजाराचे संकेत आहेत?

रक्ताची उलटी किंवा काळा मल पोटाच्या कॅन्सरचे गंभीर लक्षण आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT