Sandal Price Twitter / @JuliensAuctions
लाईफस्टाईल

Sandal Price : जगविख्यात व्यक्तीची 50 वर्षापूर्वीच्या साध्या सँडलला कोट्यवधींची बोली, किंमत ऐकून व्हाल थक्क!

फाटक्या, मळकट आणि झिजलेल्या चपलांना चक्क २ लाख १८ हजार ७०० डॉलरची बोली लागली.

कोमल दामुद्रे

Sandal Price : कधी काय होईल हे सांगणे कठीणच आहे ! पायात घातल्या जाणाऱ्या चपलीला इतका मान मिळेल याचा विचार कधीच कोणी केला नसेल. फाटक्या, मळकट आणि झिजलेल्या चपलांना चक्क २ लाख १८ हजार ७०० डॉलरची बोली लागली आहे. हे ऐकून खरेतर प्रत्येकाला धक्का बसेल. पण या तपकिरी रंगाच्या चपलेमध्ये असे काय आहे ज्यामुळे त्याला इतका भाव मिळाला जाणून घेऊया त्याबद्दल.

जुन्या वस्तू किंवा प्रसिद्ध असणाऱ्या गोष्टीची बोली लागल्याचे आपण नेहमी ऐकतो. सध्या तेच झाले आहे. ऍपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या वैयक्तिक मालकीच्या आणि परिधान केलेल्या तपकिरी स्यूडे लेदर बर्कनस्टॉक ऍरिझोना सँडल अर्थात चपलेसाठी 218,750 (रु. 1.77 कोटी) ला विकली (Sale) गेली. असे लिलाव कंपनी ज्युलियन्स ऑक्शन्सने म्हटले आहे. हा लिलाव 11 नोव्हेंबर रोजी सुरु झाला व 13 नोव्हेंबर रोजी संपला.

लिलावात नमूद केले आहे की स्टीव्ह जॉब्स यांनी ज्या गॅरेजमध्ये अॅपलची स्थापना केली त्या गॅरेजमध्ये ते ही चप्पल घालत होते. जॉब्स 1970 आणि 1980 च्या दशकात ही विशिष्ट सँडल घालत असत.

ऑक्शन हाऊसच्या वेबसाइटवरील तपशीलानुसार , ऍपलच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये स्टीव्ह जॉब्सने या सँडल परिधान केल्या होत्या. 1976 मध्ये, त्यांनी ऍपलचे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासोबत लॉस अल्टोस गॅरेजमध्ये ऍपल (Apple) कम्प्युटरची सुरुवात केली आणि अधूनमधून हे सँडल परिधान केले. जेव्हा जॉब्सने बर्केनस्टॉकची कल्पकता आणि व्यावहारिकता शोधून काढली, तेव्हा तो मोहित झाला.

स्टीव्ह जॉब्सचे 1970 च्या मध्यातील जुने सँडल रु. 1.7 कोटी पेक्षा जास्त विकले गेले. मिस्टर जॉब्स यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात या विशिष्ट सँडलची जोडी घातली होती.

याव्यतिरिक्त, या सँडल 2017 मध्ये इटलीतील मिलानमधील सलोन डेल मोबाइल, 2017 मध्ये जर्मनीमधील बर्केनस्टॉक मुख्यालय, SoHo आणि न्यूयॉर्कमधील कंपनीची पहिली यूएस साइट यासह अनेक प्रदर्शनांमध्ये दिसल्या असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT