Ghee Tea Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Ghee Tea Recipe : सकाळची सुरुवात करा एक कप तूप चहाने; आरोग्याला मिळतील थक्क करणारे फायदे

Ghee Tea Make at Home : तुम्ही दिवसाची सुरुवात सकाळी तुपाचा चहा पिऊन करू शकता. ही सवय ला्वल्यास तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक फायदे मिळतील.

Ruchika Jadhav

आजवर तुम्ही विविध पद्धतीचे चहा प्यायले असतील, ग्रीन टी, हर्बल टी, अद्रक चहा, चॉकलेट चहा असे अनेक प्रकारचे चहा बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही कधी तुपाचा चहा प्यायला आहे का. सध्या सोशल मीडियावर घी कॉफी व्हायरल झाली आहे. त्यानंतर आता तुपाचा चहा ट्रेंडमध्ये आला आहे. या चहाची सध्या तुफान चर्चा सूरू आहे.

आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे

तूप प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तूप खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांतून आपली सुटका होत असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

तुपाचे दररोज सेवन केल्याने व्यक्तीमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या समस्या

काही महिलांना पाळी येताना किंवा आल्यावर पोट दुखणे, पाठ दुखणे अशा तीव्र वेदना जाणवतात. त्यामुळे महिलांना तूप खाल्ल्यास या काळात कमी त्रास होतो.

पोट साफ होते

बऱ्याच व्यक्तींनी बद्धकोष्ठतेच्या समस्या असतात. त्यामुळे त्यांनी तुपाचे सेवन केले पाहिजे.

तुपाचा चहा कसा बनवायचा?

हा चहा बनवताना तुम्हाला दुधाचा वापर अजिबात करायचा नाही. सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात चहा पावडर आणि साखर मिक्स करून घ्या. पुढे यामध्ये एक थोडं अद्रक मिक्स करा. तसेच त्यानंतर चहा गळणीने गाळून घ्या आणि १ चमचा तूप यात मिक्स करा.

तूप मिक्स करताच चहा अगदी सॉफ्ट आणि स्मुथ टेक्सचरमध्ये तयार होतो. या चहाची चव अगदी क्रिमी असल्यासारखी लागते. आरोग्याला योग्य पोषण तत्व मिळावं यासाठी तुम्ही तुपाच्या चहाचे सेवन केले पाहिजे. काही व्यक्तींना वयानुसार हाडे कमजोर होतात. त्यामुळे या व्यक्तींनी देखील तुपात बनवलेले अन्न खाल्ले पाहिजे. त्याने हडांना मजबुती मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT