लवकरच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होतील. अशातच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सुरुवात केली असेलच. परंतु, बरेचदा अभ्यास करायचा असतो पण अभ्यास करावासा वाटत नाही. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे असेल तर मन लावून अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.
सध्या मुलांचे सगळ्यात जास्त लक्ष असते ते, सोशल नेटवर्किंग वेबसाइट, मित्र, कुटुंब, गोंगाट, ऑनलाइन गेम कडे असते. जर तुमच्या बाबतीही असे घडत असेल तर मुलांनी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे तुमचे अभ्यासात लक्षही लागेल आणि परीक्षेत (Exam) चांगले गुणही मिळतील.
आपण अभ्यासासाठी आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य जागा निवडणे अधिक महत्त्वाचे असते. अभ्यास करताना वातावरण शांत असायला हवे. बसण्यासाठी चांगली खूर्ची किंवा टेबल असायला हवा. पुस्तके व्यवस्थित ठेवण्याची सोय असावी.
अभ्यासासाठी योग्य नियोजन असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लक्ष केंद्रित कसे करता येईल हे पाहा. रोजच्या अभ्यासासाठी टाईम टेबल चार्ट बनवा, त्यानुसार अभ्यास करा. अभ्यासाला आपल्या आयुष्यातील एक भाग समजा. ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ (Time) अभ्यास करु नका.
जर तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ अभ्यास करायचा असेल तर लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. या गोष्टींमुळे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता आणि अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे अभ्यास करताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा.
अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल आणि लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम नीट वाचण्याची गरज आहे. जेव्हा अभ्यासाला बसा तेव्हा आपले लक्ष केंद्रित करा. नेहमी सकारात्मक विचारांशी जोडलेले राहा.
अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर शिस्त पाळणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी तुमचे मन दुसरीकडे भरकटू देऊ नका. त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. तुमच्या टाइम टेबलवर लक्ष केंद्रित करा.
कोणतेही काम न थांबता केले तर त्याचे तुम्हाला ओझे वाटू लागते. त्यामुळे अभ्यास करताना विश्रांती घेणे देखील गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचा मेंदू अधिक सक्रिय होईल. दर १ तासांनी ब्रेक घ्या.
अभ्यासाची पद्धत सुधारण्यासाठी तुमच्या प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमची प्रगती तपासा. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करुन यशस्वी (Success) व्हाल.
सर्व विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासाची शैली तपासणे गरजेचे असते. काहींचा अभ्यास हा सकाळी चांगला होतो तर काहींचा रात्रीच्या वेळी. त्यासाठी अभ्यासाची योग्य वेळ ठरवून घ्या.
आपली झोप चांगली झाली असेल तर आपल्याला अभ्यासावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येते. चांगल्या झोपेमुळे हार्मोन्स योग्यरित्या नियंत्रित केले जाते. त्यामुळे ७ ते ८ तास पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
निरोगी राहाण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. चांगली फळे, भाज्या, धान्ये खाल्ल्याने मेंदू तल्लख होण्यास मदत होते. पौष्टिक आणि संतुलित आहारामुळे अभ्यासातही मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.