Baingan Sabji Saam TV
लाईफस्टाईल

Baingan Sabji : या साउथ इंडिअन स्टाइलने बनवा वांग्याची भाजी; घरात प्रत्येकाला आवडेल

South Indian Style Baingan Sabji : घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने वांगी खावीत यासाठी साउथ इंडिअन स्टाइलने वांग्याची भाजी बनवा. आज आम्ही तुम्हाला याचीच रेसिपी सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

वांगी ही एक फळ भाजी आहे. अनेक व्यक्तींना वांग्याची चव फार आवडते. मात्र काही व्यक्तींना वांगी अजिबात आवडत नाहीत. त्यात बिया असल्याने काही व्यक्ती याची भाजी खाणे टाळतात. मात्र वांगी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये जास्तप्रमाणात व्हिटॅमीन आणि प्रोटीन्स असते. त्यामुळे घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने वांगी खावीत यासाठी अशा साउथ इंडिअन स्टाइलने वांग्याची भाजी बनवा. आज आम्ही तुम्हाला याचीच रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

वांगी - ४ कापलेली

तीळ - २ चमचे

धणे - २ चमचे

सुकलेली लाल मिरची - ३ ते ४

मोहरी - १ चमा

हळद - दीड चमचा

हिंग - १ चिमुट

कढीपत्ते - ६ते ८

शेंगदाणे - अर्धा कप

काजू - ८ ते १०

चिंच पाणी - दोन छोटे चमचे

तेल - आवश्यकतेनुसार

कृती

ही रेसिपी बनवताना सर्वात आधी लाल मिरची, तीळ आणि धणे भाजून घ्या आणि त्याची पावडर तयार करा. त्यानंतर सर्व वांगी चिरून घ्या. वांगी चिरून झाली की ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पुढे एका कढईमध्ये तेल घ्या. तेलात सुरुवातीला मोहरी आणि जिऱ्याची कडक फोडणी द्या. मोहरी आणि जिरे तडतडले की त्यानंतर यात शेंगदाणे मिक्स करा.

शेंगदाणे टाकल्यावर गॅस थोडा कमी करा. कारण जास्त फास्ट गॅसवर शेंगदाणे जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते. शेंगदाणे थोडे ब्राउन झाले की, पुढे यात कढीपत्त्याची पाने टाका. कढीपत्त्याची पाने सुद्धा तेलात तडतडतात. त्यानंतर स्वाद यावा म्हणून एक चिमुट हिंग मिक्स करा.

त्यानंतर यामध्ये कापलेली वांगी टाकून द्या. तसेच पुढे यात मीठ आणि हळद सुद्धा मिक्स करा. बारीक केलेला गरम मसाला सुद्धा यात मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने वांगी आणि मसाला छान शिजवा. वांगी आणि मसाला सर्व एकत्र एकजीव होऊन शिजावे यासाठी यामध्ये अगदी थोडं म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाका.

पुढे एका दुसऱ्या भांड्यात काजू बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट इमलीच्या म्हणजेच चिंचेच्या पाण्यात शिजवा. यामध्ये ही पेस्ट शिजली की ती आपल्या वांग्याच्या भाजीत ओतून द्या. त्यानंतर पुन्हा एक उकळी येऊ द्या. अशा पद्धतीने तयार झाली झटपट वांग्याची भाजी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nellore Accident: आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Jewellery Cleaning: दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक; काही मिनिटांत चमचम करेल सोन्याचा हार

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

PAK vs UAE: आधी नकार आता होकार; आशिया कपमध्ये पाकिस्तानचा ड्रामा; उशिराने सुरू होणार थरारक सामना

SCROLL FOR NEXT