South India Travel, Summer Travel Trip  Saam tv
लाईफस्टाईल

South India Travel : दक्षिण भारतातील मिनी गोव्यात फिरायला जाताय? ही पर्यटनस्थळे आहेत नयनरम्य!

Summer Travel Trip : उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात सुट्टयांचे. उन्हाळ्यात मुलांच्या शाळेला सुट्टया लागतात त्यामुळे अनेकजण फॅमिली ट्रिपचे नियोजन करतात.

कोमल दामुद्रे

Kerla Mini Goa Tour :

उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात सुट्टयांचे. उन्हाळ्यात मुलांच्या शाळेला सुट्टया लागतात त्यामुळे अनेकजण फॅमिली ट्रिपचे नियोजन करतात. जर तुम्ही देखील फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही दक्षिण भारतातील मिनी गोव्याला भेट देऊ शकता.

भारतातील पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध असलेलं दक्षिण भारत. दक्षिण भारतातील जवळपास प्रत्येक राज्य आपल्या नयनरम्य सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ अशी अनेक ठिकाणे आहेत.

केरळमध्ये असलेला वर्कला हा दक्षिण भारतातील (South India) मिनी गोवा म्हणून ओळखला जातो. तुम्हाला मिनी गोव्यात (Goa) फिरायचे असेल तर या पर्यटनस्थळांना (Travel) नक्की भेट द्या

1. वर्कला

वर्कला हे केरळमधील तिरुवनंतरपुरम जिल्ह्यात वसलेले सुंदर आणि नयनरम्य पर्यटनस्थळ आहे. हे शहर त्रिवेंद्रमच्या वायव्येस ५१ किमी अंतरावर आहे. हे केरळमधील कोल्लम या प्रसिद्ध शहरापासून सुमारे ३७ किमी अंतरावर अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे. या पर्यटनस्थळाजवळ लाटा, छोटे खडक आणि आजूबाजूला नारळाची उंच उंच झाडे पाहायला मिळतात.

2. वर्कला मिनी गोवा का म्हणतात?

वर्कला शहर हा आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या सुंदर समुद्रकिनाऱ्याला अनेकजण मिनी गोवा म्हणून ओळखतात. सूर्योदय आणि सूर्यास्तामुळे समुद्रकिनारा आणखी मनमोहक दिसतो.

केरळचा मिनी गोवा विदेशी पर्यटकांसाठी खूप खास आहे. हे लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. येथे वॉटर स्पोर्ट्स, प्लायबोर्ड, ऑक्टेन, जार्बिन बॉल आणि पॅडल बोटचा आनंद घेता येतो. या ठिकाणी पर्यटकांना कपिल सरोवर, पापनासम बीच आणि अंजेंगो किल्ला पाहाता येतो.

कपिल सरोवर सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य अतिशय मनमोहक दिसते. पापनासम बीच हे पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी अनेक पर्यटक स्थळे येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

SCROLL FOR NEXT