Apple Cider Vinegar
Apple Cider Vinegar Saam Tv
लाईफस्टाईल

Apple Cider Vinegar : घशात खवखव होतेय ? अॅपल साईडर विनेगरसोबत या गोष्टी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Apple Cider Vinegar Benefits For Health : बदलत्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव सर्दी, खोकला, आणि घशामध्ये खवखव या समस्यांमधून पाहायला मिळतो. घशामधील खवखव दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंदाच्या सिरपचा वापर करू शकता.

यामध्ये एंटीबॅक्टरियल गुण उपलब्ध असतात, जे बॅक्टेरिया संक्रमणापासून लढण्यासाठी मदत करतात. तुम्ही या पाच पद्धतीने सफरचंदाच्या सिरपचा वापर घशामधील खवखव ठीक करण्यासाठी करू शकता. चला तर मग जाऊन घेऊया अॅपल (Apple) साईडर विनेगर बद्दल.

अॅपल साईडर विनेगर आणि मध -

तुमच्या घशाची खवखव थांबण्यासाठी तुम्ही अॅपल साईडर विनेगर आणि मध ट्राय करू शकता. याच्या सेवनाने तुमच्या घशाला लवकर आराम मिळेल. यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये (Water) सफरचंदाचे व्हिनेगर आणि मध टाकून अनुशापोटी प्यायचे आहे.

अॅपल साईडर विनेगर आणि बेकिंग सोडा -

तुमच्या घशाची खवखव दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि अॅपल साईडर विनेगर अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला गरम पाण्यामध्ये अॅपल साईडर विनेगर आणि बेकिंग सोडा टाकून दिवसातून तीन ते चार वेळा गुळना करायचा आहे. असं करत राहिल्याने तुमच्या घशाला लवकर आराम मिळेल.

अॅपल साईडर विनेगर आणि लिंबू -

लिंबू हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. अशातच घशाच्या समस्येसाठी अॅपल साईडर विनेगर आणि लिंबू अतिशय फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये अॅपल साईडर विनेगर आणि लिंबू मिसळून प्यायचे आहे. तुम्हाला लवकर फायदा हवा असेल तर तुम्ही हे पेय दिवसातून दोन वेळा पिऊ शकता.

अॅपल साईडर विनेगर आणि दालचिनी -

घशाच्या समस्या दूर करण्यासाठी दालचिनी अतिशय उपयुक्त ठरते. याशिवाय दालचिनीचे अनेक फायदे सुद्धा आहेत. दालचिनीचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. घशाच्या आरामासाठी दालचिनीला एक ग्लास गरम दुधामध्ये मिसळवा. त्यानंतर दुधामध्ये एक चमचा अॅपल साईडर विनेगर आणि एक चमचा मध घालून मिक्स करून प्या.

अॅपल साईडर विनेगर आणि लाल मिरची -

यासाठी एक ग्लास गरम पाण्यामध्ये अॅपल साईडर विनेगर ऍड करा आणि एक चिमूटभर लाल मिरचीची पावडर टाका. सोबतच एक चमचा मध देखील ऍड करा. त्यानंतर या मिश्रणाने गुळना करा. हा उपाय केल्याने तुमच्या घशाची खवखव लवकर बरी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

SCROLL FOR NEXT