Dreams About Snake Saam TV
लाईफस्टाईल

Dreams About Snake: बापरे! श्रावण महिन्यात सापाचं स्वप्न पडलं ? जाणून घ्या शुभ की अशुभ

Dream Interpretation about snake: जर या काळात तुमच्या स्वप्नात पिवळा साप आला तर थोडी चिंतेची बाब आहे.

Ruchika Jadhav

Snake Dream: तुम्ही झोपेत आहात आणि अचानाक तुमच्या शेजारी एक साप येतो. हा साप तुमच्या अंगावर वेटोळे घालून बसतो. तो तुम्हाला चावणार तितक्यात तुम्हाला जाग येते आणि हे फक्त स्वप्न असल्याचं तुमच्या लक्षात येतं. असं स्वप्न अनेक व्यक्तींना पडतं. (Latest Marathi News)

साप नाव ऐकताच अनेकांना पळता भुई थोडी होते. अशात साप चावत असल्याचं स्वप्न पडल्याने व्यक्ती निराश होतात. आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं संकट येणार असं त्यांना वाटूलागतं. अशात स्वप्नात आलेला साप हा शुभ असतो की अशुभ हे स्वप्न शास्त्रानुसार जाणून घेऊ.

स्वप्नात जर सफेद साप दिसला तर तो शुभ असतो. सफेद साप दिसल्यास त्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता असते. तुमच्या ऑफिसमध्ये अथवा व्यवसायात मोठा फायदा होतो. त्यामुळे सफेद साप दिसल्यास घाबरुनये असं स्वप्न शास्त्रात म्हटलं आहे.

फना काढून बसलेला साप

जर तुम्हाला स्वप्नात (Dream) फना काढून बसलेला साप दिसला असेल तर तेही फार शुभ असते. फना काढून बसलेला साप दिसल्यावर पुढील एका महिन्यातच संपत्ती विषयी गोड बातमी ऐकू येते.

पिवळ्या रंगाचा साप

लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. अशात जर या काळात तुमच्या स्वप्नात पिवळा साप आला तर थोडी चिंतेची बाब आहे. अशा पद्धतीचे स्वप्न पडलेल्या व्यक्तींना घरापासून काही काळ दूर राहावे लागते. यामध्ये कोणताही त्रास होत नाही. फक्त कामानिमित्त त्या व्यक्तीला घरापासून दूर जावे लागते.

हिरव्या रंगाचा साप

जर तुमच्या स्वप्नात कधी हिरव्या रंगाचा साप (Snake) आला तर याचेही शुभ संकत आहेत. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे, नोकरीत आडथळे येतायत अशा व्यक्तींना हिरवा साप दिसल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीच्या मार्गाने वाटचाल सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT