Viral Snake Video: बापरे! झोपलेल्या बाळाच्या झोक्यात घुसला भला मोठा नाग; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Snake In Farmer Home Viral Video: हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
Viral Video
Viral VideoSaamtv
Published On

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला एका पेक्षा एक भयंकर व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकांची भितीने गाळण उडते. सध्या अशाच एका भल्यामोठ्या नागाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील साप एका घरात घुसला असून झोक्यात झोपलेल्या बाळाजवळ गेल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. (viral Video News In Marathi)

Viral Video
Ashish Deshmukh News: कॉंग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांचा 'भाजप'मध्ये प्रवेश! पक्षप्रवेश होताच विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील एका खेडेगावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा नागाची आधी मुंगसासोबत झटापट सुरू असते. त्याच्या तावडीतून सुटून तो एका घरात शिरतो आणि थेट बाळाच्या झोक्याकडे जातो.

ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिलं.

Viral Video
Devendra Fadnavis News: 'जंगलात कितीही प्राणी आले, तरी वाघाची शिकार...'; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर नेम

व्हिडिओमध्ये हा साप दारातून थेट व्हरांड्यात येत असल्याचे दिसत आहे. व्हरांड्यात आल्यानंतर तो थेट बाळाच्या झोक्याकडे वळतो, आणि बाळाच्या झोक्यावर चढून फणा काढून उभा राहतो. साप बाळाच्या झोक्यात गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी एकच गोंधळ केल्याचे या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे.

बाळाच्या झोक्यावर वाळत टाकलेल्या कपड्यांना हा साप बराच काळ लटकत उभा राहतो. व्हिडिओमध्ये लोकांचा घाबरलेला आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. कोणत्याही क्षणी हल्ला करेल असाच या सापाचा पवित्रा असल्याने पाहणारे शेतकरी कुटूंबातील महिला चांगल्याच घाबरलेल्या दिसत आहेत.

डॉ. प्रशांत भामरे या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी शेतात घर असणाऱ्या शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपल्या घराच्या आजूबाजूचा, शेताजवळचा परिसर स्वच्छ ठेवण्याचेही आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com