स्मार्टफोन स्लो झालाय? 'हे' केल्याने तुमच्या मोबाईलचा परफॉर्मन्स नक्की वाढेल
स्मार्टफोन स्लो झालाय? 'हे' केल्याने तुमच्या मोबाईलचा परफॉर्मन्स नक्की वाढेल Saam Tv News
लाईफस्टाईल

स्मार्टफोन स्लो झालाय? 'हे' केल्याने तुमच्या मोबाईलचा परफॉर्मन्स नक्की वाढेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभुत गरजा होत्या, मात्र आता त्यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे स्मार्टफोनची. स्मार्टफोनशिवाय आपली दैनंदिन कामं होत असतात. मात्र स्मार्टफोनचा परफॉर्मन्स जेव्हा स्लो होतो किंवा स्मार्टफोनची गती कमी होते तेव्हा आपल्या कामात एकतर व्यत्यय येतो किंवा कामाला उशीर होतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. स्मार्टफोन स्लो झाला असेल तर काय करावं? याबद्दल आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत, त्या टीप्स खालीलप्रमाणे (Smartphone slow? Doing this will definitely increase the performance of your mobile)

हे देखील पहा -

१) स्मार्टफोन सतत अद्यावत (अपडेटेड) ठेवा

आपण जेव्हा नवीन स्मार्टफोन घेतो तेव्हा काही दिवसांनी आपल्याला सिक्युरीटी अपडेट, सॉफ्टवेअर अपडेट हे आपल्या मोबाईलच्या सेटींगमध्ये पाठवले जातात.ते अपटेड करणे गरजेचे असते. फोन वेळोवेळी अपडेटेड ठेवल्याने त्यातील बग्स काढले जाऊन अनेक त्रुटी दुर केल्या जातात. या बग पॅचेसमुळे आपल्या स्मार्टफोनची गती वाढायला मदत होते. त्यामुळे आपले स्मार्टफोन सतत अपडेटेड ठेवा.

२) इंटरनल स्टोरेज कमी ठेवणे

आपल्या मोबाईलमध्ये अनेकदा असा डेटा असतो की, ज्याची आपल्याला गरज नसते. उदा. ब्लर फोटोज्, व्हिडिओज, बघून झालेल्या मुव्हीज, डॉक्युमेंट फाईल्स, व्हॉट्सअॅप चॅट्स असा कितीतरी जीबीचा डेटा पडून असतो. यामुळे रॅम जास्त वापरला जाऊन फोनची गती कमी कर होतेच शिवाय फोन तापतोसुद्धा. त्यामुळे नको असलेला डेटा सतत डिलीट करत रहावा.

३) मोबाईल रीस्टार्ट करणे

आपण सतत मोबाईल वापरतो आणि बॅटरी संपत आली की चार्जिंगला लावतो, पण मोबाईलला ऑफ होऊन देत नाही जे चुकीचं आहे. सतत वापर केल्याने आपल्या फोनमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर ताण येतो, मोबाईल गरम होतो आणि हळुहळु मोबाईलची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे दिवसातून काही मिनिटे जेव्हा मोबाईलची गरज पडणार नाही अशावेळी तो स्वीच ऑफ करावा किंवा रीस्टार्ट करावा. यामुळे टेम्पोरेरी मेमरी डिलीट होऊन मोबाईल फास्ट होतो.

४) फॅक्टरी डेटा रीसेट करणे

जर वरील सगळे उपाय करुनही मोबाईलची गती वाढत नसेल तर आपल्याला करता येणारा शेवटचा उपाय म्हणजे फॅक्टरी डेटा रीसेट करणे. हे करताना अगोदर फोनमधील महत्वाचा डेटा दुसऱ्या डिव्हाईसमध्ये कॉपी करुन ठेवा कारण फॅक्टरी डेटा रीसेट म्हणजे मोबाईलमधील पुर्ण डेटा डिलीट करणे होय. हे केल्यानंतर तुमचा मोबाईल बऱ्यापैकी फास्ट होईल, कारण यात सगळं काही डिलीच झाल्याने रॅम आणि रोम खाली असेल आणि त्यामुळे मोबाईलचा परफॉर्मन्स सुधारलेला असेल. तर या टीप्स तुम्हाला कशा वाटल्या याबद्दल नक्की सांगा.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

SCROLL FOR NEXT