Smartphone Side Effects Saam TV
लाईफस्टाईल

Smartphone Side Effects : मोबाइल फोन दिवसभर वापरत असाल तर, आजच सोडा ही सवय, अन्यथा होईल गंभीर परिणाम! वाचा

Ruchika Jadhav

मोबाई फोन आणि व्यक्ती यांचं एक वेगळं समिकरण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीकडे आज अँड्रॉइड फोन आहे. फोनचा वापर करून व्यक्ती सतत अपडेट राहतो, शिवाय एकमेकांशी संवाद साधतो. यासह अनेक कामे फोनशी जोडलेली असतात. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यक्ती फोनचा वापर करतात.

फोनचा जास्त वापर केल्याने याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. काही व्यक्तींनातर सतत फोन वापरल्याने अनेक भयंकर आजार जडले आहेत. त्यामुळे आज फोनपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे याची महिती जाणून घेणार आहोत.

फोनच्या वापराने शरीरावर होणारा परिणाम

डोळ्यांच्या समस्या

जास्तप्रमाणात फोन वापरणाऱ्या व्यक्तीला सतत स्क्रिन पाहून दृष्टी कमी होण्याची समस्या निर्माण होते. डोळ्यांवर फोनची लाइट वाईट इफेक्ट करते. त्यामुळे डोळे लाल होतात आणि डोळ्यांवर सुज येते.

मान आणि डोकं दुखणे

फोन वापरताना आपली मान स्थिर असते. बारच वेळ मनोरंजनात गुंतल्याने आपलं स्वत:कडे लक्ष राहत नाही. त्यामुळे मान आणि डोकं दुखू लागतं.

झोपेच्या समस्या

सतत फोन वापरल्याने व्यक्तीची झोप कमी होते. डोळ्यांवर ताण आल्याने झोपेच्या समस्या वाढत चालल्या आहेत.

वजन वाढते

फोनचा जास्त वापर करणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आळशी होतो. त्यामुळे व्यक्तीचं वजन वाढण्यास सुरूवात होते.

या टिप्सने फोनपासून दूर राहाल

वेळ ठरवून घ्या - आपण फोन केव्हा आणि कधी तसेच किती वेळासाठी वापरायचा याची वेळ ठरवून घ्या. ठरावीक वेळेनुसारच फोन वापरा.

फोन लांब ठेवा

झोपतान फोन तुमच्या रुममधून बाहेर ठेवा. फोन रुममध्ये असल्यास रात्री सतत मॅसेज येत असल्याने झोप पूर्ण होत नाही.

डिजिटल डिटॉक्स करा

वेळो-वेळी तुम्ही स्वत: फोनपासून दूर राहा. हळू हळू करून फोन दूर ठेवल्याने तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुधारेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT