iPhone
iPhone Saam Tv

आयफोन युजर्सना सरकारचा इशारा! तुमच्या फोनचा डेटा आणि खात्यातून पैसेही होतील गायब; 'या' चुका करणे टाळा

Apple Users: अॅपल कंपनी स्मार्टफोनमधील सर्वात नावाजलेली कंपनी आहे. कंपनीच्या युजर्ससाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने अॅपल युजर्संना इशारा दिला आहे.
Published on

Government Advisory For Apple Users:

अॅपल कंपनी स्मार्टफोनमधील सर्वात नावाजलेली कंपनी आहे. कंपनीच्या युजर्ससाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने अॅपल युजर्संना इशारा दिला आहे. तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. त्यासाठी सरकारने युजर्संना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. (Latest News)

सरकारने नवीन अॅडवायझरी जारी केली आहे. त्यात CIAD-2024-0007 नोट युजर्संना देण्यात आली आहे. ज्यात तुमचा पर्सनल डेटा चोरी होऊ शकतो. याचा हॅकर्स फायदा घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बँकेतील पैसे चोरीला जाऊ शकतात. त्यासाठी सावगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. अॅपल फोन वापरताना नेहमी काळजी घ्यावी. कोणतीही ऑनलाइन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगायला हवी. तसेच तुमचे लोकेशन शेअर करणे टाळावे. याचा हॅकर्स फायदा घेतात. त्यामुळे तुमच्या डिव्हाइसवर कंट्रोल ठेवू शकतात.

iPhone
Smartphone: Vivo चे दोन तगडे फीचर्स असलेले फोन ३ हजारांनी स्वस्त; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत

आयफोन युजर्ससाठी हा इशारा देण्यात आला आहे.फोनमधील एक चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते. तुमच्या फोनचा अॅक्सेस कोणालाही मिळणार नाही याची काळजी घ्या. तुमचा पासवर्ड चांगला ठेवा. जेणेकरुन हॅकर्संना त्याचा गैरफायदा घेता येऊ नये.

तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी तो अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आयफोन नेहमी अपडेट केल्यास त्यातील फोनचा डेटा चोरणे कठीण होते. स्मार्टफोनचे लोकेशन बंद ठेवा. जेणेकरुन कोणी तुमचे लोकेशन ट्रॅक करु शकणार नाही.

iPhone
Nokia कंपनीचा मोठा निर्णय; नोकियाचे फोन बाजारातून अन् लोकांपासून होणार Disconnect

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com