Benefits Soap In Car  Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits Soap In Car : इवलुसा साबणाचा तुकडा घेईल कारची काळजी, फायदे वाचून थक्क व्हाल!

Shraddha Thik

Benefits Soap :

कारची मालक होणे जसे महागात पडते, परंतू त्यानंतर कारची काळजी घेणे त्यापेक्षाही जास्त महागात पडणारे असते. बहुतेक लोक त्यांच्या कारमधील अशा दोषांची दुरुस्ती करण्यासाठी वर्षभरात हजारो रुपये खर्च करतात, जे त्यांना माहिती असल्यास ते स्वतःच दूर करू शकतात. तुम्ही तुमचा ड्रायव्हिंगचा अनुभव देखील सुधारू शकता. हे सर्व फक्त साबणाच्या पट्टीच्या मदतीने केले जाऊ शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कसे ते जाणून घेऊया-

गाडीपासून दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी

गाडी व्यवस्थित स्वच्छ ठेवली नाही तर विचित्र वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी लोक सहसा महागडे एअर फ्रेशनर वापरतात. पण ज्यांना सुगंधांची ऍलर्जी आहे त्यांना मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत सुगंधित साबण खूप उपयुक्त ठरतात. याच्या अरोमाथेरपीमुळे गाडीतून दुर्गंधीची समस्या (Problem) दूर होते.

कारच्या दरवाज्यातून येणार्‍या आवाजासाठी

जर तुमच्या कारचे (Car) दरवाजे उघडताना आणि बंद करताना आवाज येत असेल तर तो दुरुस्त होईपर्यंत तुम्ही साबणाच्या मदतीने तो थांबवू शकता. यासाठी दाराच्या बोल्टवर साबण घासणे म्हणजे ते जिथे वळते.

विंडशील्ड स्वच्छ करण्यासाठी

कार चालवताना, विंडशील्ड चांगली स्वच्छ (Clean) असणे आवश्यक आहे जेणेकरून पुढे रस्ता स्पष्टपणे दिसू शकेल. पण कधी कधी तो इतका घाण होतो की वायपरनेही साफ करता येत नाही आणि तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. परंतु जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही विंडशील्डवर साबणाचा बार घासून वर्तमानपत्राने स्वच्छ करू शकता. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा. फक्त साबण हळूवारपणे घासणे लक्षात ठेवा अन्यथा विंडशील्ड स्क्रॅच होऊ शकते.

बाजूच्या आरशातून पुन्हा पुन्हा पाणी पुसावे लागणार नाही

पावसामुळे बाजूच्या आरशांवर पाणी साचल्याने मागे दिसणे कठीण होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा पुसत राहावे लागते. अशा स्थितीत त्यावर साबणाचा बार चोळावा. त्यामुळे त्यावर पाणी साचणार नाही.

दरवाजाच्या रबरी पट्टीचा आवाज थांबविण्यासाठी

दरवाजा उघडताना आणि बंद करताना आवाज येण्याची समस्या ही रिम खराब झाल्यास त्यावर बसवलेल्या रबर पट्टीमुळे देखील उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही त्यावर कोरडा साबण काही दिवस चोळू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT